‘त्या’ प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांनी प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा का दिला होता?; आव्हाड यांच्याच जुन्या सहकाऱ्याचा सवाल

छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून लाथ मारुन हाकलावे अशी मागणी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केली होती. त्यानंतर भुजबळ यांनी नगर येथील ओबीसींच्या एल्गार मेळाव्यात आपण 16 नोव्हेबरलाच मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता असा गौप्यस्फोट भुजबळ यांनी केला. ओबीसींच्या अंबड येथील पहिल्या मेळाव्याच्या आदल्या दिवशीच आपण राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. यावरुन आता आव्हाड यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

'त्या' प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांनी प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा का दिला होता?; आव्हाड यांच्याच जुन्या सहकाऱ्याचा सवाल
JITENDRA AWHADImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Feb 05, 2024 | 2:52 PM

मुंबई | 5 फेब्रुवारी 2024 : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामतीत कोणताही उमेदवार दिला तरी तो अजित पवार समजून मतदान करा, ते भावनिक आवाहन करतायत ही शेवटची निवडणूक आहे. परंतू त्यांची शेवटची निवडणूक कधी येतच नाही अशा शब्दात आपले काका शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. यावर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बापाच्या मरणाची वाट पाहणारी अवलाद कधी बघितली नाही अशी टीका अजितदादांवर केली आहे. यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांना ‘ध’ चा ‘मा’ करणे उत्तम जमतं. शरद पवार हे दीर्घायुषी होवोत आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभावे हीच आमची इच्छा असल्याचे आनंद परांजपे यांनी म्हटले आहे.

अजित पवार यांनी बारामती निवडणूकीत कुणाच्या भावनिक आव्हानांना बळी पडू नका. ते म्हणतील शेवटची निवडणूक आहे ते त्यास भुलू नका अशा शब्दात आपलेच काका शरद पवार यांच्या अप्रत्यक्ष टीका केली होती. त्यावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या प्रचंड टीका केली आहे. बापाच्या मरणाची वाट पाहणारी अवलाद कधी पाहीली नाही असे आव्हाड यांनी अजितदादांवर टीका करताना म्हटले आहे. यावर आता अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी आव्हाड यांच्यावर पलटवार केला आहे. आव्हाड नेहमीच अजितदादांवर अक्राळ-विक्राळ बोलतात, अजितदादा यांच्या नेतृत्वात अनेक आमदार आणि खासदार निवडून येत असतात हे नाकारणार का असाही सवाल परांजपे यांनी केला आहे.

छगन भुजबळ यांना खरेच राजीनामा द्यायचा होता तर योग्य व्यक्तीकडे द्यायला हवा होता अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. यावर आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांनाच आरसा दाखवला आहे. ज्यावेळी रिधा रशीद या महिलेने त्यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता. तेव्हा आव्हाड यांनी उद्विग्न होऊवन आपल्या आमदारकीचा राजीनामा हा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना का पाटवून दिला ? त्यांनी तो राजीनामा उपसभापती नरहरी झिरवल यांना का पाठवला नाही? त्यामुळे जितेंद्र आव्हाड हे नुसते स्टंट करतात हे अनेकदा स्पष्ट झाले असल्याचे आनंद परांजपे यांनी म्हटले आहे.

गोळीबाराची घटना अत्यंत चुकीची

कल्याण-उल्हासनगरातील गोळीबारीची घटना अत्यंत चुकीची आहे. त्याचं समर्थन कोणी करू शकत नाही. पण ठाण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन एक बैठक घ्यावी आणि हे वातावरण शांत कराव लागणार आहे. हा संघर्ष थांबवायचा असेल तर मुख्यमंत्र्यांनाच यात पुढाकार घ्यावा लागेल, त्यामुळे हा तणाव लवकर निवळेल अशी आशा असल्याचे आनंद परांजपे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.