माझ्या मुलीला आणि जावयाला धमकी देणारा अधिकारी मुख्यमंत्र्याचा लाडका, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्रा येथईल आमदार जितेंद्र आव्हाड यांना आणि त्यांच्या मुलगी तसेच जावयाला जीवे मारण्याचं संभाषण असलेली एक ऑडिओ क्लिप काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती होती.

माझ्या मुलीला आणि जावयाला धमकी देणारा अधिकारी मुख्यमंत्र्याचा लाडका, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 2:35 PM

मुंबई : माझ्या मुलीला आणि जावयाला धमकी देणारा अधिकारी हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लाडका आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आशीर्वादानेच त्याची दादागिरी सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनीच या अधिकाऱ्याला अभय दिलं आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्रा येथील आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला आहे. ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांने दाऊदच्या माणसाच्या मदतीने जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याची एक ऑडिओ क्लिप काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. यानंतर आव्हाड समर्थकांनी सदर अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली. सदर अधिकाऱ्याला मुख्यमंत्र्यांचेच अभय असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांचे आरोप म्हणजे केवळ सनसनाटी माजवण्याचा प्रयत्न आहे, असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं होतं.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्र्यांना जर नाटत असेल ही सनसनाटी माजवण्याचा प्रयत्न असेल तर त्यांची प्रगल्भता किती आहे हे पहावं लागेल. मुलीला डावावर लावून कुणी सनसनाटी करत नाही. एवढे कुटुंबवत्सल मुख्यमंत्री नसेल तर ते राज्याचं दुर्दैव आहे. माझ्या पोरीला, जावयाला, मारून टाकण्याची धमकी दिली आहे. तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लाडका अधिकारी आहे. त्यांच्या जीवावर दादागिरी करतोय. त्याला झाकण्यासाठी पोलिसांनी कारवाई केलेली नाही. मुख्यमंत्री त्यांना संरक्षण देत आहेत, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्रा येथईल आमदार जितेंद्र आव्हाड यांना आणि त्यांच्या मुलगी तसेच जावयाला जीवे मारण्याचं संभाषण असलेली एक ऑडिओ क्लिप काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती होती. या क्लिपमध्ये होलणारी व्यक्ती आव्हाड, त्यांची मुलगी आणि जावयाला मारण्याचा कट आखत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर यांच्या मदतीने शूटर तैनात केले असल्याचे संवाद या क्लिपमध्ये आहेत. ठाणे महापालिकेतील अधिकारी महेश आहेर यांची ही ऑडिओ क्लिप असल्याचा आरोप आव्हाड यांचा आहे. क्लिप व्हायरल झाल्यानंतर आव्हाड समर्थकांनी महेश आहेर यांना मारहाण केली होती. याविरोधात आव्हाड तसेच त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र आहेर यांच्याविरोधात कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.