राम कोणाच्या मालकीचा नाही, जितेंद्र आव्हाडांकडून उद्धव ठाकरेंची पाठराखण

ज्यांना रामाच्या नावाने राजकारण करायचे आहे. त्यांचे हे धंदे आहे. आम्हाला काहीही फरक पडत नाही असेही जितेंद्र आव्हाड (jitendra awhad on cm uddhav thackeray ayodhya tour) म्हणाले.

राम कोणाच्या मालकीचा नाही, जितेंद्र आव्हाडांकडून उद्धव ठाकरेंची पाठराखण
Follow us
| Updated on: Jan 25, 2020 | 3:03 PM

ठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी केली (jitendra awhad on cm uddhav thackeray ayodhya tour) आहे. यावरुन अनेकांकडून टीका केली जात असताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंची पाठराखण केली आहे. “राम हा कोणाच्या मालकीचा नाही. उद्धव ठाकरे यांची श्रद्धा रामावर आहे. तर त्यात चुकीचे काय? त्याचा सरकारशी काय संबंध?” असा प्रश्नही आव्हाडांनी उपस्थित केला.

“राम ही श्रद्धा आहे. मी खंडोबा, कोलकातामधील दुर्गा मातेच्या मंदिरात जातो. तुळजापूर, नाशिकची शप्तश्रृंगीला जातो. देव हा एकच आहे. त्यामुळे ते रामाकडे गेलो तर काय फरक पडतो?” असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांना विचारला.

“राम हा कोणाच्या मालकीचा नाही. उद्धव ठाकरे यांची रामावर श्रद्धा आहे. तर त्यात चुकीचे काय? त्याच सरकारशी काय संबंध? उद्या मी जरी जायचं ठरवलं तर मला कोण अडवून शकतो? बघायला गेलो तर काही जण रामाला मानतात. दक्षिणमध्ये रावणाची पुजा होते हे श्रद्धास्थान आहे. मला वाटत नाही की त्यामध्ये राजकारण करावे. ज्यांना रामाच्या नावाने राजकारण करायचे आहे. त्यांचे हे धंदे आहे. आम्हाला काहीही फरक पडत नाही,” असेही जितेंद्र आव्हाड (jitendra awhad on cm uddhav thackeray ayodhya tour) म्हणाले.

“जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एवढी कडक पावले उचलली होती असं मला वाटत नाही. जेव्हा ते गृहमंत्री होते तेव्हा आणि त्यांच्याच पक्षातील सातत्याने बोलणारा जितेंद्र आव्हाड यांना कधीच जयंत पाटील यांनी अडवले नाही. 2007 मध्ये मी सांगलीत गेलो होतो. धर्मनिरपेक्षवर भाषण करायला सांगितल्यावर व्याख्यानात मी भिडे गुरुजी बाबत जे बोलायचे होतो ते बोललो होतो. विशेष म्हणजे हे व्याख्यान जयंत पाटील यांनीच ठेवले होते. त्यामुळे प्रकाश आंबेडकर काय करतात. त्याबाबत मला काही बोलायचे नाही,” अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

“राज्य सरकारच्या अधिकारावरती केंद्र सरकार गदा आणून संविधान अपमानित करीत आहे. हे योग्य नाही. सरकार हे उद्धव ठाकरेंच नाही, शरद पवारांचं नाही, तर हे 12 कोटी जनतेचे आहे. या 12 कोटी मराठी मनांच्या अधिकारांवर गदा आणण्याचं काम केंद्र सरकार करत असून ते योग्य (jitendra awhad on cm uddhav thackeray ayodhya tour) नाही,” अशी टीकाही आव्हाडांनी केंद्र सरकारवर केली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.