निर्मलाअक्का, आहे हा देश ड्रामा करणाऱ्यांचा, आव्हाडांचं सीतारमन यांना उत्तर
राहुल गांधी रस्त्यांवर पायी चालणाऱ्या स्थलांतरित मजुरांजवळ जाऊन ड्रामेबाजी करत आहेत, अशी टीका काल सीतारमन यांनी केली होती.(Jitendra Awhad on Nirmala Sitharaman)
मुंबई : जर माणुसकी आणि संवेदना व्यक्त करणं करणे ड्रामा बाजी असेल, तर हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे’ असा टोला गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांना हाणला आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी रस्त्यांवर पायी चालणाऱ्या स्थलांतरित मजुरांजवळ जाऊन ड्रामेबाजी करत आहेत, अशी टीका काल सीतारमन यांनी केली होती. (Jitendra Awhad on Nirmala Sitharaman)
“स्थलांतरित मजुरांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या बाजूला बसणे, गप्पा मारणे, त्यांच्याबरोबर चालणे.. राहुल गांधींची ड्रामाबाजी आहे, असे निर्मलाअक्कांचे म्हणणे आहे. जर माणुसकी आणि संवेदना व्यक्त करणे ड्रामाबाजी आहे, तर मग हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे. माणुसकी इथे व्यक्त होतेच” असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
स्थलांतरित मजुरांना दिलासा देण्या साठी त्यांच्या बाजूला बसणे, गप्पा मारणे ,त्यांच्या बरोबर चालणे.. राहुल गांधींची ड्रामा बाजी आहे असे निर्मलाअक्कांचे म्हणणे आहे जर माणुसकी आणि संवेदना व्यक्त करणे ड्रामा बाजी आहे तर मग हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे माणुसकी इथे व्यक्त होतेच
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 18, 2020
(Jitendra Awhad on Nirmala Sitharaman)
हेही वाचा : ड्रामेबाजी करण्यापेक्षा मजुरांच्या सूटकेस धरा, सीतारमन राहुल गांधींवर भडकल्या, सोनियांना हात जोडून विनंती
“स्थलांतरितांसाठी ट्रेन मागवा, असं काँग्रेस पक्ष त्यांच्या राज्य सरकारांना का बोलला नाही? स्थलांतरित मजुरांचा रस्ता अडवून त्यांच्याशी बातचीत करुन राजकारण करायची ही वेळ आहे का? मग ड्रामेबाज कोण आहे?”, असा सवाल सीतारमन यांनी उपस्थित केला होता.
“स्थलांतरित मजूर हवालदिल होऊन रस्त्यावर पायी जात असतील तेव्हा त्यांच्या मदतीला धावून जा. त्यांना आपल्या गावी सोडण्यासाठी केंद्राकडून ट्रेन मागवा. तुम्ही सांगाल तिथे तीन तासांत रेल्वे दाखल होईल. त्यांच्याजवळ बसून त्यांच्याशी बातचीत करुन त्यांचा प्रश्न सुटणार नाही. अन्यथा काँग्रेसच्या नेत्यांनी रस्त्यावर चालणाऱ्या मजुरांसोबत चालत जावं, त्यांची सूटकेस पकडावी. हे मला अत्यंत दु:खी होऊन व्यक्त करावं लागत आहे”, असा घणाघात निर्मला सीतारमन यांनी केला होता.
हेही वाचा : मजुरांची हतबलता ड्रामेबाजी वाटते का? सीतारमन यांच्या टीकेला कॉंग्रेसचं उत्तर
“स्थलांतरित मजुरांना दिलासा देण्याऐवजी जखमेवर मीठ चोळणं बंद करा. ते मजूर आहेत, मजबूर (लाचार) नाहीत. श्रमिक आणि कामगारांचा अपमान करु नका. हा देश तुम्हाला माफ करणार नाही. संवेदनहीन सरकारला सर्व मजुरांची माफी मागावी लागेल”, असं प्रत्युत्तर कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी सीतारमन यांना दिलं होतं. (Jitendra Awhad on Nirmala Sitharaman)