जितेंद्र आव्हाडांनी अभिनेत्री दीपाली सय्यदसाठी गायलं खास गाणे

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड विरुद्ध दीपाली सय्यद (Deepali Sayyad vs Jitendra Awhad mumbra kalwa)  अशी इथे लढत होणार आहे.

जितेंद्र आव्हाडांनी अभिनेत्री दीपाली सय्यदसाठी गायलं खास गाणे
Follow us
| Updated on: Oct 04, 2019 | 2:42 PM

ठाणे : कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने अभिनेत्री दीपाली सय्यदला (Deepali Sayyad vs Jitendra Awhad mumbra kalwa) उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड विरुद्ध दीपाली सय्यद (Deepali Sayyad vs Jitendra Awhad mumbra kalwa)  अशी इथे लढत होणार आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी काल उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शरद पवार यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढली. मात्र कालच्या वेळेअभावी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आज पूर्ण केली.

दरम्यान, आज जितेंद्र आव्हाड यांनी दीपाली सय्यद यांच्यासाठी गाणे गाऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. “बाबुल की दुआए लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले. मयके की कभी ना याद आये, ससुराल मे इतना प्यार मिले” हे गाणं आव्हाडांनी गायलं.

पंधरा दिवसांसाठी आलेली आमची माहेरवाशीण बहीण आमच्या मानवी धर्माप्रमाणे तिचं खूप औक्षण होईल, तिला खूप माया दिली जाईल आणि त्यांनतर दीड लाखांच्या फरकाने तिला सासरी पाठविण्याची व्यवस्था देखील केली जाईल, असेदेखील आव्हाड म्हणाले.

कोण आहे दीपाली सय्यद?

  •  दीपाली सय्यद ही अभिनेत्री म्हणून परिचीत आहे
  • अनेक मराठी चित्रपट, मालिका आणि रिअलिटी शोमध्ये दीपाली सय्यद दिसली आहे.
  • दीपाली सय्यदने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अरविंद केजरीवालांच्या आपकडून निवडणूक लढवली होती.
  • त्या निवडणुकीत दीपाली सय्यदचा पराभव झाला होता.
  • दीपाली सय्यद यांनी काही दिवसांपूर्वी आप सोडून विनायक मेटेंच्या शिवसंग्राम संघटनेते प्रवेश केला
  • गेल्या काही दिवसांपासून दीपाली सय्यद सामाजिक कार्यांमध्ये पाहायला मिळत आहेत.
  • 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांना पाठिंबा दिला होता.

संबंधित बातम्या 

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात शिवसेनेकडून मराठी अभिनेत्रीला उमेदवारी   

सुजय विखेंना ‘या’ अभिनेत्रीचा एका अटीवर पाठिंबा! 

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.