विरार पूर्वेला मनवेलपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये राडा सुरू आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेरलं आहे. त्यांच्यावर पैसे वाटपासाठी पैसे आणल्याचा आरोप होत आहे. एक मोठा राडा सुरु आहे. टीव्हीवर याच फुटेज दाखवलं जातय. आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
“माझं निवडणूक आयोग, पोलिसांना स्पष्ट सांगणं आहे की, बाहेरची लोक मतदारसंघात येऊन काय करतात? त्यांना मतदारसंघाची काय माहिती आहे? माझ्या इथे डोंगर आहेत, अंधाऱ्या गल्ल्या आहेत. उद्या आतमध्ये एखादा अनोळखी माणूस घुसला. चोर म्हणून लोकांनी त्याला चोपलं तो मेला मग काय करायचं?” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
‘पोलिसांनी पक्षाचा गणवेश घालावा’
“नाकेबंदी नाही, कोणीही येतं, कुठेही घुसतं, आम्ही व्हिडिओ दाखवला दारुच्या बाटल्या नेतानाच. पोलीस म्हणतात, त्या पाण्याच्या बाटल्या असू शकतात. पोलिसांना हे माहित नाही की, खाकी बॉक्समधून कधीही पाण्याच्या बाटल्या जात नाहीत, खाकी बॉक्समधूनच दारुच्या बाटल्या नेल्या जातात. माझ्याकडे व्हिडिओ आहे, पोलिसांनी मला जे उत्तर दिलं, त्यांना मी म्हटलं सॉरी. सत्ताधारीच पोलीस चालवत आहेत. पोलिसांनी पोलीस गणवेश सोडून पक्षाचा गणवेश घालावा असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.