Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jitendra Awhad : मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय- जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड आमदारीचा राजीनामा का देणार आहेत? वाचा सविस्तर

Jitendra Awhad : मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय- जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाडImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 14, 2022 | 7:52 AM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad News) यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं ट्वीट केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) चर्चांना उधाण आलंय. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याविरोधात 72 तासांच्या आत पोलिसांनी दोन खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा आरोपही ट्वीटच्या (Jitendra Awhad Tweet) माध्यमातून केला आहे. ही लोकशाहीची हत्या असल्याचंही त्यांनी म्हटलंय. आपल्याविरोधातील अत्याचाराविरोधात लढा देणार असल्याचं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

दरम्यान, आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. त्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर आंदोलनही केलं होतं.

जितेंद्र आव्हाड यांचं ट्वीट

पाहा व्हिडीओ :

जितेंद्र आव्हाड यांच्यावर काय आरोप?

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याचा आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा पोलिसांनी नोंदवला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीदरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी धक्का दिल्याचा आरोप भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलाय. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जितेंद्र आव्हाडांविरोधात मुंब्रा पोलिसात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. दरम्यान मुख्यमंत्र्यानी मला न्याय द्यावा, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याच्या वतीने करण्यात आली आहे.

या तक्रारीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे. त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलाय. आपल्यावर दाखल केलेला गुन्हा खोटा असल्याचं त्यांनी म्हटलंय.

जितेंद्र आव्हाड यांना नुकताच जामीन मिळाला होता. विवियाना मॉलमधील मारहाणप्रकरणी वर्तक नगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी अटक केली होती. त्यानंतर शनिवारी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर केला होता. हर हर महादेवस सिनेमाचा शो जितेंद्र आव्हाड यांनी बंद पाडला होता. या सिनेमात दाखवण्यात आलेल्या इतिहासावर त्यांनी आक्षेप नोंदवला होता.

शनिवारी जामीन मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांनी अखेर आपण राजीनामा देण्याचा निर्णय घेत असल्याचं ट्वीट करत जाहीर केलंय.

'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.