मला दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही, आव्हाडांची गणेश नाईकांवर बोचरी टीका
जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhads answer to Ganesh Naik) यांनी पुन्हा एकदा भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर हल्ला चढवला.
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhads answer to Ganesh Naik) यांनी पुन्हा एकदा भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर हल्ला चढवला. गणेश नाईक यांनी डायलॉगबाजी करुन, ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल, असं आव्हाडांवर टीकास्त्र सोडलं होतं, त्याला आव्हाडांनी (Jitendra Awhads answer to Ganesh Naik) उत्तर दिलं. आव्हाड म्हणाले, “जितेंद्र आव्हाड स्वतःचे डायलॉग स्वत: मारतो, कोणाचे चोरलेले डायलॉग मारत नाही. मी स्वत: स्क्रिप्ट लिहितो, स्वत: डायलॉग मारतो आणि स्वत:च्या आवाजात मारतो. मी एकदाच नवी मुंबईत गेलो तर गणेश नाईकांनी कथककल्लीच सुरु केली आहे. अजून तर मी शंभरवेळा जाणार आहे. त्यानंतर माझा बापदेखील येईल. मला दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही”.
नाईक विरुद्ध आव्हाड, नेमकं काय झालं? वाचा : “ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल”, गणेश नाईकांचा आव्हाडांवर पलटवार
राजकारणाची जत्रा झालीय असं ते म्हणतात. मात्र जत्रेत ज्या झोळ्या लटकत असतात, त्याप्रमाणे गणेश नाईकांनी राजकारण केलं. 90 ते 2000 एका झोळीवर, 2000 ते 2014 पर्यंत एका झोळीवर, आता दुसऱ्याच झोळीवर आहेत. त्यामुळे आता ते या झोळीवर किती दिवस राहतील माहित नाही. नवी मुंबईकरांना था था थय्याच बघायचा बाकी आहे, असं आव्हाड म्हणाले.
आग्र्यांची घरं तोडत होते तेव्हा तुम्ही काय केलं? घरं सुरक्षित राहावी यासाठी तुम्ही काय केलं? वाढलेली गावठाणं सुरक्षित राहावीत यासाठी काय केलं? नव्या सीमा आखल्या पाहिजेत ते काही नाही केलं? आता तुम्हाला आग्री समाज आठवेल, आग्र्यांचं प्रेम जागं होईल. या आग्र्यांच्या घरात जाऊन किती वेळा जेवलात? कोणत्या सणात सहभागी झालात? ते आता सगळं निघणार, वाट बघा, असा सल्ला जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते गणेश नाईक यांना दिला.
गणेश नाईक काय म्हणाले होते?
जितेंद्र आव्हाडांच्या टीकेला गणेश नाईक यांनी कालच प्रत्युत्तर दिलं होतं. “ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक”, हा नाना पाटेकर यांच्या सिनेमातील डायलॉग म्हणत गणेश नाईक यांनी आव्हाडांवर पलटवार केला होता.
“कोणी मुंबईवरुन, कोणी ठाण्यावरुन, कोणी पुण्यावरुन या शहराचा कारभार करु शकतं का? आणि करु शकतील, तर पहिला तुमच्या शहरात करा”, असं म्हणत गणेश नाईकांनी जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला होता.
आव्हाड काय म्हणाले होते?
“काय केले या नाईकांनी. जे झाले ते काँग्रेसच्या माध्यमातून झाले. आता दिवस संपले. माझे देखील आयुष्य यांनी खराब केलं, माझे कुटुंब देखील खराब केलं, शरद पवार यांना सांगितले आम्ही जाणार नाही आणि भाजपात गेले. अशा गद्दारांना मी विचारत नाही”, असं म्हणत आव्हाडांनी नाईक पिता-पुत्रांवर ताशेरे ओढले होते.
“इमारतींचे आणि इतर कंत्राट कोणाकडे. खंडणी आणि धमकी या नवी मुंबईत कोणाचे चालते या गणेश नाईक यांचे. एवढीच श्रीमंती असेल तर जागा गरिबांना कधी देणार”, असं म्हणत आव्हाडांनी गणेश नाईकांवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते.
संबंधित बातम्या
“ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल”, गणेश नाईकांचा आव्हाडांवर पलटवार
मी राष्ट्रवादी सोडण्याचं कारण पवारांना माहित, त्यांनी सुनावलं तर गप्प बसेन : गणेश नाईक