काँग्रेसला आणखी एक धक्का, ज्योतिरादित्य शिंदे यांचा सरचिटणीस पदाचा राजीनामा
काँग्रेसमधील राजीनामा सत्र सुरुच आहे. मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी रविवारी (7 जुलै) त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. राहुल गांधींप्रमाणेच ट्विटरच्या माध्यमातून ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजीनाम्याची माहिती दिली.
भोपाल : काँग्रेसमधील राजीनामा सत्र सुरुच आहे. मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी रविवारी (7 जुलै) त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. राहुल गांधींप्रमाणेच ट्विटरच्या माध्यमातून ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजीनाम्याची माहिती दिली.
Accepting the people’s verdict and taking accountability, I had submitted my resignation as General Secretary of AICC to Shri @RahulGandhi.
I thank him for entrusting me with this responsibility and for giving me the opportunity to serve our party.
— Jyotiraditya Scindia (@JM_Scindia) July 7, 2019
“नागरिकांचा निर्णय स्वीकारत आणि त्याची पूर्ण जबाबदारी घेत, मी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा राहुल गांधीकडे सुपूर्द केला आहे. माझ्यावर सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवून विश्वास दर्शवला आणि मला पक्षाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो”, असं ट्वीट ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलं.
दरम्यान, आजच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनीही त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकांपूर्वी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी मिलिंद देवरा यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, देशासह मुंबईतही काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे मुंबईतील लोकसभेतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत मिलिंद देवरांनी राजीनामा दिला.
Jyotiraditya Scindia: Accepting the people’s verdict and taking accountability, I had submitted my resignation as General Secretary of AICC to Rahul Gandhi. I thank him for entrusting me with this responsibility and for giving me the opportunity to serve our party. https://t.co/002mILVqIx
— ANI (@ANI) July 7, 2019
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरुच आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनीही राजीनामा दिला. त्यानंतर महाराष्ट्रातही काँग्रेसला राजीनाम्याचे ग्रहण लागल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनीही त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. या राजीनामा सत्रामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा : काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरुच, मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरांचा राजीनामा
कोण आहेत ज्योतिरादित्य शिंदे?
ज्योतिरादित्य शिंदे हे अखील भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांचं सुरुवातीचं शिक्षण मुंबईत झालं. नंतर देहरादूनच्या प्रसिद्ध दून स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. स्टॅरफोर्ड बिझनेस स्कूलमध्ये पुढील शिक्षण घेतलं. यानंतर ते साडेसात वर्ष अमेरिकेत राहिले आणि नोकरी केली. त्यांचे वडील माधवराव शिंदे यांचं विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर ज्योतिरादित्य राजकारणात आले.
गुना या मध्य प्रदेशातील मतदारसंघातून पहिल्यांदा त्यांनी 2002 साली निवडणूक लढवली आणि निवडून आले. आतापर्यंत ते सलग 4 वेळा निवडून आले आहेत. 2012 ते 2014 या काळात त्यांना यूपीए सरकारमध्ये मंत्रीपदही देण्यात आलं होतं. त्यांची आत्या वसुंधरा राजे या राजस्थानच्या मावळत्या मुख्यमंत्री होत्या. तर यशोधरा राजे मध्य प्रदेश सरकारमध्ये मंत्री होत्या.
राजघराण्यातील असूनही साधं राहणं, सौम्य संवाद, उदार मन आणि सरळ स्वभाव हे ज्योतिरादित्य शिंदे यांचं वैशिष्ट्य आहे. पक्षातील युवा नेता म्हणून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली होती. राहुल गांधी यांच्या विश्वासतील नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे.
संबंधित बातम्या :
श्रीमंत उमेदवार : ज्योतिरादित्य शिंदे तब्बल 334 कोटींचे मालक
दिवसभर बैठकात व्यस्त, ज्योतिरादित्य शिंदे लग्नाचा वाढदिवसही विसरले
स्वातंत्र्योत्तर भारतात पहिल्यांदाच संसदेत शिंदे घराण्यातील एकही जण नसेल!
राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी, आत्या आणि भाच्याचं मनोमिलन