मालवणमध्ये रंगतदार लढत, शिवसेनेच्या वैभव नाईकांविरोधात काँग्रेसकडून काका कुडाळकरांना उमेदवारी
काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून कुडाळ मालवण मतदारसंघासाठी काका कुडाळकरांना (Kaka kuldalkar fight assembly election) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची चांगली धामधुम सुरु आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून कुडाळ मालवण मतदारसंघासाठी काका कुडाळकरांना (Kaka kuldalkar fight assembly election) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना नेते वैभव नाईक यांच्या विरोधात काका कुडाळकर (Kaka kuldalkar vs Vaibhav Naik) लढणार आहेत. त्यामुळे मालवणमध्ये रंगतदार लढत पाहायला (Kaka kuldalkar vs Vaibhav Naik) मिळणार आहे.
काका कुडाळकर यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काका कुडाळकर यांना कुडाळ मालवणमधून उमेदवारी दिल्याने माजी आमदार आणि काँग्रेसचे निष्ठावान पुष्पसेन सावंत यांना उमेदवारी (Kaka kuldalkar vs Vaibhav Naik) नाकारण्यात आली होती. त्यामुळे शिवसेनेच्या वैभव नाईक यांच्याविरोधात काँग्रेसचे काका कुडाळकर लढणार आहे.
दरम्यान काका कुडाळकरांना उमेदवारी दिल्याने भाजप शिवसेनेसह काँग्रेसमधूनही आयारामांना उमेदवारी देण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. शुक्रवारी 4 ऑक्टोबरला काका कुडाळकर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
काका कुडाळकर कोण आहेत?
– माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आक्रमक आणि अभ्यासू नेता अशीही काका कुडाळकरांची ओळख आहे.
-मात्र, 2014 च्या निवडणुकीदरम्यान नितेश राणे यांच्याशी वाद झाल्याने, काका कुडाळकर आणि माजी आमदार राजन तेली यांनी एकाच वेळी राणेंपासून फारकत घेतली होती. मात्र, आक्रमक काका कुडाळकर भाजपमध्ये रमले नाहीत.
– काँग्रेसचे अच्छे दिन पाहून काका कुडाळकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
-काका कुडाळकर यांच्या काँग्रेस प्रवेशाने कुडाळ- मालवण विधानसभा मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलेली पाहायला मिळत आहेत.