राजकारण करण्यासाठी घंटा नाद आंदोलन, शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रेंची भाजपवर टीका

फक्त राजकारण करण्यासाठी घंटा नाद आंदोलन केलं गेलं आहे, असा आरोप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी भाजपवर केला आहे.

राजकारण करण्यासाठी घंटा नाद आंदोलन, शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रेंची भाजपवर टीका
Follow us
| Updated on: Aug 29, 2020 | 4:21 PM

डोंबिवली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 5 महिन्यांपासून बंद असलेली मंदिरं उघडावीत (BJP Ghantanad Protest) या मागणीसाठी भाजपतर्फे राज्यभरात घंटा नाद आंदोलन करण्यात आले. (Shivsena Corporator Dipesh Mhatre Criticize BJP) कल्याण-डोंबिवलीत देखील भाजप आमदारांनी मंदिराबाहेर आंदोलन केले. याबाबत शिवसेनेचे युवासेना नेते आणि नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी डोंबिवली भाजपवर टीका केली आहे (Shivsena Corporator Dipesh Mhatre Criticize BJP).

कोरोना प्रादुर्भाव काळात जेव्हा कल्याण डोंबिवलीत रुग्णांना बेड, आयसीओ, ऑक्सिजन मिळत नव्हते, जेव्हा नागरिकांना गरज होती तेव्हा ही मंडळी कुठे होती. फक्त राजकारण करण्यासाठी घंटा नाद आंदोलन केलं गेलं आहे, असा आरोप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केला आहे.

रायगड जिल्ह्यातही ठिकठिकाणी भाजपचं घंटा नाद आंदोलन

मंदिरे खुली करण्याची मागणी घेऊन आज रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी घंटा नाद आंदोलन करण्यात आले. अलिबाग, कर्जत, रोहासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजपकडून आंदोलन करण्यात आले.

जिल्हाध्यक्ष अँड. महेश मोहीते, उपाध्यक्ष अमित घाग, भाजपा किसान मोर्चाचे सरचिटणीस सुनिल गोगटे यांनी जागोजागी या आंदोलनाचं नेतृत्त्व केलं.

राज्यात मदिरालय सुरु, देवालय का बंद? – भाजप धुळे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यांपासून संपूर्ण राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. राज्यात मदिरालय (दारु दुकानं) सुरु मग देवालय का बंद?, असा प्रश्ना भाजपचे धुळे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी यावेळी उपस्थित केला. आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने धुळे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर आज घंटा नाद आंदोलन करण्यात आलं.

यावेळी खान्देशची कुलदैवत असलेल्या एकविरा देवीच्या मंदिराच्या आवारात भाजपाच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी महाआघाडीची सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करत ‘दार उघड उद्धवा मंदिराचे दार उघड’ अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी धुळे शहरातील एकविरा देवी मंदिरांच्या प्रवेशद्वारावर जोरदार घंटानाद करुन राज्य सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले (Shivsena Corporator Dipesh Mhatre Criticize BJP).

यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपाचे धुळे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, हिरामण गवळी, धुळे मनपाचे सभापती सुनील बैसाने, नगरसेवक नागसेन बोरसे, नगरसेविका प्रतिभाताई चौधरी, सागर चौधरी, शशी मोगलाईकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या घंटा नाद आंदोलन सहभागी झाले होते.

मिरजेत चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्त्वात चंद्रकांत पाटील

दारुची दुकाने सुरु करणाऱ्या राज्य सरकारने राज्यातील सर्व मंदिरे सुरु करावीत, या मागणीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली मिरजेत घंटा नाद आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारने त्वरित राज्यातील सर्व मंदिरे सुरु करावीत, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून केली.

भाजप उपाध्यक्ष राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगरात आंदोलन

भाजप उपाध्यक्ष राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगरात आंदोलन करण्यात आलं. यावेळी राम शिंदे यांची सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांना, भाविकांना या सरकारने वेठीस धरण्याचा काम या तिघाडी सरकारने केले, तर यापेक्षा तीव्र आंदोलन करु, असा इशाला राम शिंदे यांनी सरकारला दिला.

कर्जत शहरातील गोधड महाराज मंदिरासमोर आंदोलन करण्यात आलं. इतर राज्यात केंद्र सरकाच्या आदेशाने मंदिर खुले केली. मात्र, आपल्याकडे ती सुरु केली नाही, त्यामुळे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं.

राज्य सरकार काही निर्णय घेत नाही, त्यांना सुप्रीम कोर्टाने निर्देश दिल्यानंतर, फटकारल्या नंतर ते निर्णय लागू करतात. शेतकऱ्यांचा दुधाचा निर्णय असेल बाजार, तसेच भाविक भक्तांचा , सांस्कृतिक वारसा आपल्याला लाभलेला असताना मंदिरे उघडली जात नाही. त्यामुळे भाजपने आंदोलन छेडले. शेतकऱ्यांना, भाविकांना जर या सरकारने वेठीस धरण्याचा काम या तिघाडी सरकारने केले या पेक्षा तीव्र आंदोलन करु, असं यावेळी राम शिंदे यांनी सांगितलं.

Shivsena Corporator Dipesh Mhatre Criticize BJP

संबंधित बातम्या :

राज्यभरात भाजपचं मंदिरं सुरु करण्यासाठी घंटानाद आंदोलन, ‘दार उघड, उद्धवा दार उघड’ची घोषणाबाजी

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.