राहुल गांधी देशाचे प्रधानमंत्री झाले तर भाजप नेत्यांना जेलमध्ये टाकणं सोपे होईल- नाना पटोले

Nana Patole on Rahul Gandhi : राहुल गांधी देशाचे प्रधानमंत्री झाले तर या सर्वांना जेलमध्ये टाकायला आम्हाला सोपे होईल; नाना पटोले यांचा भाजप नेत्यांवर निशाणा

राहुल गांधी देशाचे प्रधानमंत्री झाले तर भाजप नेत्यांना जेलमध्ये टाकणं सोपे होईल- नाना पटोले
Follow us
| Updated on: Jun 21, 2023 | 2:43 PM

कल्याण : ईडीने आज 10 ठिकाणी छापेमारी केली. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीची धाड टाकली. तसंच संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या घरावर आणि कार्यालयात ईडीने चौकशी केली. या सगळ्या प्रकरणावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारलं असता त्यांनी भाजपवर टीका केली तसंच इशाराही दिलाय.

देशामध्ये बदल्याचं राजकारण सुरू आहे. या देशाला भ्रष्टाचार मुक्त करायचा असेल तर एक सोपं काम आता मोदी सरकारने केलेलं आहे. जे काय भ्रष्टाचारी लोक होते. ज्यांच्यावर ईडी आणि सीबीआयच्या चौकशी सुरू झाल्या त्यांच्यावर दबाव आणून भाजमध्ये दाखल करून घेतलं. त्यामुळे अनेक लोक भाजपचे नेते म्हणून एकत्रित आलेले आहेत. उद्या राहुल गांधी देशाचे प्रधानमंत्री झाले तर या सर्वांना जेलमध्ये टाकायला आम्हाला सोपे होईल, असं उपरोधात्मक टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

जसजसं निवडणुका जवळ येत आहेत. तसतसं विरोधकांना दाबण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल. हे काही आता नवीन नाही. त्याचमुळे विरोधी पक्षातल नेत्यांच्या घरांवर ईडीच्या धाडी टाकण्यात येत आहेत. ही सगळी काही भीती आमच्या लक्षात आहे. त्यामुळे ईडीच्या दबावात विरोधी पक्ष येणार नाही भाजपला सत्तेच्या बाहेर काढणं आज विरोधी पक्षाचा एकमेव अजेंडा आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

देशाला वाचवायचं असेल तर देशाचं संविधान वाचवायचं असेल तर भाजपला सत्तेच्या बाहेर काढल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जनताच यांना उत्तर देईल. भाजपला घरी बसवेन आणि काँग्रेसची सत्ता येईल, असं नाना पटोले म्हणालेत.

शेतीच्या पिकाची खरेदीची सरकार करतं. त्याला सुतळी जे लागतं ती बाजारात 75 किलो रुपये आहे. सरकार त्याला साडेपाचशे रुपये किलोच्या भावने घेतात. म्हणजे कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार हा अशा पद्धतीचा भ्रष्टाचार हा राज्य सरकार करत आहे. 2014 ते 2019 चा काळ होता. ज्या ठिकाणी देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री होते. कॅंग रिपोर्ट पाहिला तर त्या काळात भ्रष्टाचार रेकॉर्ड फडणीस सरकारच्या काळात झाला आहे, असा आरोपही नाना पटोले यांनी केली आहे.

गेल्या पंचवीस वर्षात मुंबई महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेना हे दोघे एकत्र होते. या दोन वर्षाची एसटी लावण्यापेक्षा गेल्या पंचवीस वर्षाची एसटी लावावी. जेव्हा तुम्ही सोबत होता. त्या वेळेचा भ्रष्टाचार तुम्हाला मान्य आहे. आता दोन वर्षात भ्रष्टाचार चालला असं भाजप काय आम्ही वेगळे आज त्यांना दाखवाच भ्रष्टाचारांची काय संबंध नाही, असं नाना पटोले म्हणालेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.