Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Shivsena : कल्याण शिवसेना उपशहर प्रमुखावर हल्ला! उद्धव ठाकरेंनंतर मुख्यमंत्री शिंदेंच्या सुपुत्रांचीही पालांडेंशी ‘फोन पे चर्चा’

Kalyan News : पालांडे यांच्यावर बुधवारी सकाळच्या सुमारास हल्ला झाला होता

Kalyan Shivsena : कल्याण शिवसेना उपशहर प्रमुखावर हल्ला! उद्धव ठाकरेंनंतर मुख्यमंत्री शिंदेंच्या सुपुत्रांचीही पालांडेंशी 'फोन पे चर्चा'
कल्याण शिवसेना..Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 8:50 AM

कल्याण : कल्याणमध्ये शिवसेना उपशहर प्रमुखावर (Kalyan Shiv Sena Politics) बुधवारी हल्ला करण्यात आला. या हल्ल्याची गंभीर दखल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. त्यांच्या तब्बेतीची चौकशी केली होती. दरम्यान, आता तर चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनीही जखमी शिवसेना (Shivsena News) उपशहर प्रमुखाची चौकशी केली. चौकशीसाठी श्रीकांत शिंदे यांनी हर्षवर्धन पालांडे यांना फोन केला होता. फोन करुन त्यांच्या तब्बेतीची विचारपूसही यावेळी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी केली. दरम्यान, त्याआधी उद्धव ठाकरे यांनीहीह हर्षवर्धन पालांडे यांना फोन केल्याचं वृत्त समोर आलं होतं. बुधवारी सकाळी हर्षवर्धन पालांडे यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर कल्याणमधील राजकीय वातावरण तापलं होतं. आपल्यावर मेहश गायकवाड यांच्या सांगण्यावर हल्ला झाला असावा, असा आरोप हर्षवर्धन पालांडे यांनी केला होता. तर दुसरकडे महेश गायकवाड यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते.

जीवघेण्या हल्ल्याने खळबळ

कल्याण पूर्वेतील शिवसेना उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर बुधवारी सकाळच्या सुमारास हल्ला झाला होता. हा हल्ला माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या सहकाऱ्यानी केल्याचा आरोप पालांडे यांनी केल्याने एकच खळबळ उडाली होती. महेश गायकवाड हे एकनाथ शिंदे समर्थक असल्याने या प्रकरणाला वेगळच वळण लागलं. तर दुसरीकडे महेश गायकवाड यांनी देखील आरोपांचं खंडन करत घडलेली घटना दुर्दैवी आहे, माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही, असं स्पष्ट केलं होतं.

फोन पे चर्चा..

मात्र पालांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांही फोन करून पालांडे यांच्या तब्येतीची चौकशी करत भेट घेण्यास सांगितलं होतं. त्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील पालांडे यांना फोन करत त्यांच्या तब्बेतीची चौकशी करत डी सिपींशी सोबत बोलून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यास सांगणार असल्याचे आश्वासन दिल्याचे पालांडे यांनी सांगितलंय.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन कॉल करून पालांडे यांची विचारपूस केली होती. त्याचा वचपा घेऊ नंतर, त्याची काळजी करू नका, तुम्ही आधी एकदम व्यवस्थित व्हा, मी येईन तुम्हाला भेटायला, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पालांडे यांना धीर दिला होता. या फोन कॉलचं रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनीही आपल्याला फोन केल्याची माहिती पालांडे यांनी दिलीय.

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.