Mohit Kamboj : सिंचन घोटाळ्याबाबत कंबोज यांचं ट्विट, ‘लवकरच राष्ट्रावादीचा बडा नेता तुरुंगात’; कंबोज यांचा रोख अजित पवारांकडे?
आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) हे आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत. त्यांनी सिंचन घोट्यासंदर्भात एकापाठोपाठ पाच ट्विट केले आहेत.
मुंबई : आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) हे आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत. त्यांनी सिंचन घोट्यासंदर्भात एकापाठोपाठ पाच ट्विट केले आहेत. आपण पत्रकार परिषद घेऊन लवकरच राष्ट्रवादीच्या (NCP) बड्या नेत्याचा पर्दाफाश करणार आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. मोहित कंबोज यांचा रोख हा राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे असल्याचे बोलले जात आहे. कंबोज यांनी एक ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय पांडे आणि संजय राऊत या चार जणांची नावं आहेत. पाचवी जागा रिक्त ठेवण्यात आली आहे. तसेच ‘आमचा स्ट्राईक रेट 100 टक्के’ असं देखील त्यांनी म्हटले आहे. यामध्ये आम्ही ज्यांच्यावर आरोप करतो ते शंभर टक्के तुरुंगात जातात असेच कंबोज यांना सुचवायचे आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. मात्र अधिवेशनापेक्षाही अधिक चर्चा आज कंबोज यांच्याच ट्विटची सुरू आहे.
नेमकं काय म्हटलंय कंबोज यांनी?
कंबोज यांनी सिंचन घोटाळ्यासंदर्भात एकापाठोपाठ पाच ट्विट केले आहेत. त्यांनी आपल्या शेवटच्या ट्विटमध्ये चार जणांच्या नावाचा उल्लेख केला आहे. ज्यामध्ये संजय राऊत, संजय पांडे, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्या नावाचा समावेश आहे. त्यांनी पाचवी जागा रिक्त ठेवली आहे. तसेच आमचा स्ट्रईक रेट 100 टक्के असं कंबोज यांनी म्हटलं आहे. आम्ही ज्यांच्यावर आरोप करतो त्यांच्यावर कारवाई होतेच असं कंबोज यांना सुचवायचं आहे का असा प्रश्न आता निर्माण होत आहे. कंबोज यांचा संपूर्ण रोख हा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे असल्याचे बोलले जात आहे.
1:- Anil Deshmukh 2:- Nawab Malik 3:- Sanjay Panday 4:- Sanjay Raut 5:- ____________
अपना 100% Strike Rate Hai !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) August 17, 2022
अमोल मिटकरींचा कंबोज यांच्यावर निशाणा
दरम्यान दुसरीकडे मोहित कंबोज यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना अमोल मिटकरी यांनी कंबोज यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. कंबोज हे भाजपाचा भोंगा असल्याची टीका त्यांनी केली आहे. हनुमान चालीसाच्यावेळी कंबोज यांनी लोकांना भोंगे पुरवले. मात्र जीएसटी, महागाई, वाढत असलेले दर यावरून ते एकही शद्ब बोलत नसल्याची टीका मिटकरी यांनी केली आहे. तसेच कोणत्या नेत्याची चौकशी होणार आहे, हे कंबोज यांना कसे माहित होते याची देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.