Raj Thackeray : ‘राज ठाकरेंना कोण रोखतं ते बघतेच मी…’ साध्वी कांचनगिरी यांचं बृजभूषण सिंहाना चॅलेंज

Kanchangiri on Raj Thackeray : बुजभूषण सिंह यांच्यावर कांचनगिरी यांनी जोरदार निशाणा साधला. संतांचा सन्मान न करणारे, राष्ट्राचा काय सन्मान करणार? असा सवाल कांचनगिरी यांनी उपस्थित केलाय.

Raj Thackeray : 'राज ठाकरेंना कोण रोखतं ते बघतेच मी...' साध्वी कांचनगिरी यांचं बृजभूषण सिंहाना चॅलेंज
राज ठाकरेंचा कांचनगिरी यांचा पाठिंबाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 9:10 AM

उत्तर प्रदेश : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) अयोध्या दौऱ्याला (MNS Ayodhya Tour) एकीकडे भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी विरोध केलाय. उत्तर प्रदेशच्या जनतेची माफी मागा, या मागणीवर ते ठाम आहेत. तर आता दुसरीकडे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला स्वाध्वी कांचनगिरी यांनी पाठिंबा दिलाय. सोबत त्यांनी बृजभूषण सिंह यांनी थेट आव्हानही दिलंय. मोदींना पत्र लिहून बृजभूषण सिंह यांना समजवा, अशी मागणी साध्वी कांचनगिरी यांनी केली आहे. तसंच राज ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून कोण रोखतं ते मी बघतेच, असं म्हणत त्यांनी बृजभूषण सिंहांना चुचकारलंय. बुजभूषण सिंह यांच्यावर कांचनगिरी यांनी जोरदार निशाणा साधला. संतांचा सन्मान न करणारे, राष्ट्राचा काय सन्मान करणार? असा सवाल कांचनगिरी यांनी बृजभूषण सिंह यांनी उपस्थित केलाय. तर दुसरीकडे राज ठाकरे यांचं तोंडभरुन कौतुकही केलंय.

काय म्हणाल्या कांचनगिरी? : पाहा व्हिडीओ

कांचनगिरी यांनी टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्या बातचीत करताना बृजभूषण सिंह यांच्यावर टीका केली. राज ठाकरेंची बाजू घेत साध्वी कांचनगिरी यांचा बृजभूषण सिंहावर पलटवार केलाय. त्यांनी म्हटलंय, की…

हे सुद्धा वाचा

राज साहेबांचं सगळ्यात आधी मी अभिनंदन करते. त्यांच्यात बाळासाहेबांची छबी दिसते.. ते हिंदूंचा आवाज आहेत.. भोंगे उतरवण्याबाबत त्यांचं अभिनंदन..

बृजभूषण यांचे हात रक्ताने माखलेले आहेत, त्यांनी दुसऱ्याकडे बोट दाखवून नये..त्यांना संतांच्या रोषाचा सामना करावा लागेल.. मोदींना याबाबत पत्र लिहिलंय. त्यांना समजवा.. त्यांना संतांचा सामना करावा लागेल.. चमकण्यासाठी बृजभूषण काम करतायत.. बृजभूषण यांना रोखावं

जर तुम्हाला जराजरी दया असती, तर तुम्ही फॅक्टरी लावली असती, लोकांना काम दिलं असतं… रोजगार दिला असता… मी चॅलेंज करते.. राज येणारच.. मी बघतेच बृजभूषण किती विरोध करतात ते..यांची काय हिंमत आहे…मी यांना बघून घेईल.. मी एकटी यांना पुरून उरेन..

जर तुम्ही एका संताचा सन्मान करु शकत नाही, तर राष्ट्राचा सन्मान तुम्ही काय करणार राज ठाकरेंचा संताप्रती आदर आणि प्रेम दिसून येतो..माझ्याकडेही बृजभूषण यांच्याविरोधात अनेक पुरावे आहेत.. बघुया कुणात किती दम आहे..

राज ठाकरेंना कोण रोखतं ते बघतेच मी…

5 जून रोजी राज ठाकरेंचा दौरा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 5 जून रोजी अयोध्या दौरा असणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार बृजभूषण सिंहांनी केलेल्या विरोधामुळे राजकीय वातावरण तापलंय. याआधी मनसे नेत्यांनीही बृजभूषण सिंहाना आव्हान दिलं होतं.

दरम्यान, यूपीतल्या लोकांनी माफी मागितल्या शिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार आहे, असं आव्हान बृजभूषण सिंहांनी दिलं होतं. तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्ते कामाला लागल्याचंही दिसून येतंय. मनसेकडून राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी केली जातेय.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.