जो बायडन म्हणजे ‘गजनी’, वर्षभरही सत्तेत राहणार नाहीत; कंगनाचं भाकीत

बायडन यांच्या विजयानंतर जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छा वर्षाव होत असताना बॉलिवूडमधील वादग्रस्त अभिनेत्री कंगना रनौतने बायडन एक वर्षही सत्तेवर राहणार नाही, असं भाकित वर्तवलं आहे.

जो बायडन म्हणजे 'गजनी', वर्षभरही सत्तेत राहणार नाहीत; कंगनाचं भाकीत
Follow us
| Updated on: Nov 08, 2020 | 9:32 PM

नवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या (US Election) निवडणुकीत मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना कडवी झुंज देऊन जो बायडन (Joe Biden) विजयी झाले. या निवडणुकीत जो बायडन यांना 279 इलेक्टोरल मते मिळाली तर ट्रम्प यांना अवघे 214 इलेक्टोरल मते मिळाली. या विजयाबरोबरच बायडन हे अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष ठरले. बायडन यांच्या विजयानंतर जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छा वर्षाव होत असताना बॉलिवूडमधील वादग्रस्त अभिनेत्री कंगना रनौतने बायडन एक वर्षही सत्तेवर राहणार नाही, असं भाकित वर्तवलं आहे. (Kangana Ranaut Comment On Joe Biden win)

जो बायडन यांना गजनी बायडन म्हणत कंगनाने त्यांच्यावर निशाणा साधलाय. “ज्यांचा डाटा 5 मिनिटांनी क्रॅश होतो त्यांच्यावर मला खात्री नाही. बायडन वर्षभरही सत्तेत राहणार नाहीत”, असा दावा तिने केला आहे. यासंदर्भात तिने ट्विट केलं आहे. तिचं हे ट्विट चांगलंच व्हायरल होत आहे.

जो बायडन यांच्यावर टीका करताना कंगनाने कमला हॅरिस यांचं कौतुक केलं. “कमला हॅरिस अमेरिकेच्या पुढील शो चे नेतृत्व करणार आहेत. जेव्हा एक स्त्री जागी होते तेव्हा ती दुसऱ्या स्त्रीसाठी एक नाव मार्ग तयार करते. हा ऐतिहासिक दिवस आपण साजरा केला पाहिजे, असं कंगना म्हणाली.

जो बायडन शुक्रवारी आणि शनिवारी जॉर्जिया आणि पेन्सिलवेनिया या महत्त्वाच्या राज्यांत त्यांचे प्रतिस्पर्धी आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढे होते. अखेर या दोन्हीही राज्यांत बायडन यांनी ट्रम्प यांना पराभूत केलं. जो बायडन यांच्याबरोबर कमला हॅरिस देखील अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्या आहेत. अमेरिकेच्या पहिल्या भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्षा म्हणून त्यांच्या नावे विक्रम प्रस्थापित झाला आहे.

“अमेरिकेसारख्या महासत्ताधीश देशाचं नेतृत्व करण्याची अमेरिकेच्या जनतेने मला संधी दिली. अमेरिकन जनतेने केलेला हा माझा सन्मान आहे. जनतेने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आभारी आहे. तुमचा विश्वास सार्थ करण्याचा मी प्रयत्न करेन”, असं ट्विट करत निकालानंतर जो बायडन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

बायडन यांच्याबरोबरच अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या कमला हॅरिस विजयी झाल्या आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या कमला हॅरिस पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष ठरल्या आहेत. कमला हॅरिस यांनी विजयानंतर देशाला संबोधित केले. कमला हॅरिस यांनी विजयाचे श्रेय त्यांच्या आई श्यामला गोपालन यांना दिले आहे. “श्यामला गोपालन यांनी अमेरिकेत मोठा संघर्ष केला, त्या वयाच्या 19व्या वर्षी भारतातून अमेरिकेत आल्या होत्या.”, असं कमला हॅरिस यांनी सांगितले.

(Kangana Ranaut Comment On Joe Biden win)

संबंधित बातम्या

Kamala Harris | कमला हॅरिस यांच्याकडून विजयाचे श्रेय आईला, जो बायडन यांनाही धन्यवाद

Kamala Harris | भारतीयवंशाच्या कमला हॅरिस यांचा ऐतिहासिक विजय, अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष

जो बायडन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प यांचा पराभव

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकताच बायडन यांचं पहिलं ट्विट, म्हणतात…

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.