Kangana Ranaut Rajbhavan | राज्यपाल कोश्यारींना माझ्यावरील अन्यायाविषयी सांगितले, कंगना रनौत राजभवनावर

माझे भाग्य आहे की राज्यपालांनी माझे म्हणणे स्वत:च्या मुलीसारखे ऐकून घेतले, अशी प्रतिक्रिया कंगनाने भेटीनंतर दिली.

Kangana Ranaut Rajbhavan | राज्यपाल कोश्यारींना माझ्यावरील अन्यायाविषयी सांगितले, कंगना रनौत राजभवनावर
| Updated on: Sep 13, 2020 | 5:33 PM

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवनात गेली होती. कंगनाच्या वांद्र्यातील कार्यालयावर मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. साधारण 40 मिनिटे दोघांची चर्चा झाली. (Kangana Ranaut meets Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Rajbhavan)

“मी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. मला मिळालेल्या अन्यायकारक वागणुकीबद्दल सांगितले. मला आशा आहे की मला न्याय मिळेल, जेणेकरुन तरुण मुलींसह सर्व नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास पुन्हा संपादन होईल. माझे भाग्य आहे की राज्यपालांनी माझे म्हणणे स्वत:च्या मुलीसारखे ऐकून घेतले” अशी प्रतिक्रिया कंगनाने भेटीनंतर दिली.

कंगना दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास वांद्र्यातील घरातून निघाली, तर चार वाजण्याच्या सुमारास ती राजभवनात पोहोचली. यावेळी तिची बहीण रंगोलीही तिच्यासोबत होती. पाच वाजता कंगना राजभवनातून निघाली.

भगतसिंग कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार अजॉय मेहता यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत नाराजी पोहोचवली होती. उद्धव ठाकरे यांनी कंगना रनौत प्रकरणाची अयोग्य पद्धतीने हाताळणी केली, असे राज्यपालांचे मत असल्याचे बोलले जाते.

(Kangana Ranaut meets Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Rajbhavan)

कंगना रनौतची वक्तव्ये आणि कार्यालयावर केलेल्या कारवाईनंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार अजॉय मेहता यांना बोलावले होते. “कंगनाने राज्य सरकारविरोधात वक्तव्ये केल्यानंतर एका दिवसात तिचे कार्यालय पाडण्यात आले. याविषयी राज्यपाल नाराज आहेत. त्यांनी आपल्या भावना उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्यास मेहता यांना सांगितले” अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली होती.

दुसरीकडे, रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनीही कंगनाला भेटीसाठी घरी बोलावले होते. त्यानंतर त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेत कंगनाविषयी चर्चा केली होती.

संबंधित बातम्या : 

“हा माझा सर्वात आवडता फोटो, यात माझ्या आयुष्याला मिळालेली कलाटणी”, कंगना रनौतचं नवं ट्वीट

उद्धव ठाकरे, आज माझं घर तोडलं, उद्या तुझा गर्व तुटेल, कंगनाकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख

(Kangana Ranaut meets Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Rajbhavan)