नवी दिल्ली : दिवसेंदिवस केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला (Agneepath Yojana) विरोध वाढत आहे. काँग्रेस नेता कन्हैया कुमार यानेही या योजनेला कडाडून विरोध केला आहे. आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकार आणि या योजनेवर भाष्य केलं. “केंद्र सरकारने ही योजना आणताना देशातील तरूणांशी संवाद साधणं गरजेचं होतं. अग्निपथ योजना आम्ही आणतोय, त्याबाबत केंद्र सरकारने कुणाशी आणि काय चर्चा केली, त्याबाबत स्पष्टीकरण द्या”, असं कन्हैय्या कुमारने (Kanhaiya Kumar) म्हटलंय.
“अग्निपथ योजना सरकारने मागे घ्यावी, सरकारने लॉलीपॉप दाखवायचं बंद करावं, असं कन्हैय्याने म्हटलंय. शिवाय बिहारमध्ये बेरोजगारी दर जास्त आहे”, त्यावर कामन होणं गरजेचं असल्याचंही त्याने म्हटलं आहे.
केंद्र सरकारच्या नव्या योजनेवर कन्हैयाने टीका केली आहे. “केंद्र सरकारने ही योजना आणताना देशातील तरूणांशी संवाद साधणं गरजेचं होतं. अग्निपथ योजना आम्ही आणतोय, त्याबाबत केंद्र सरकारने कुणाशी आणि काय चर्चा केली, त्याबाबत स्पष्टीकरण द्या. सैन्यात जाणारे गरीब, शेतकरी, कष्टकरी असतात, राजकीय नेत्यांची मुलं सैन्यात जात नाहीत”, असं कन्हैय्या कुमारने म्हटलंय.
अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी देशभर आंदोलन होत आहे. यात सार्वजनिक मालमत्तेची जाळपोळ केली जात आहे. त्याबाबतही कन्हैय्याने आंदोलकांना महत्नाचा सल्ला दिला आहे. “तरुणांनी देशाच्या संपत्तीचे नुकसान करू नये, सत्य आणि अहिंसा मार्गाने तरुणांनी आंदोलन करावं”, असं कन्हैय्याने म्हटलंय.
अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी देशभरातील तरूण रस्त्यावर उतरले आहेत. हे आंदोलन सध्या आणखी धारदार होत आहे. अश्यातच आता राज्यातही याची धग जाणवू लागली आहे. युवक राष्ट्रवादीही आक्रमक झाली आहे. राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा युवक राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.