राजकारणातील परस्पर विरोधी चित्र; आधी फेटा बांधला, आता राम शिंदे, रोहित पवारांनी एकमेकांकडे पाहिलंही नाही!

रोहित पवार यांनी दबाव टाकून ऐनवेळी भाजपच्या उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप करत राम शिंदे यांनी संत शिरोमणी गोदड महाराज मंदिरासमोर ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. अशावेळी रोहित पवार यांनीही दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावली. पण यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडे साधं पाहिलंही नाही. या पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला राजकारणातील परस्पर विरोधी चित्र इथं दाखवणार आहोत.

राजकारणातील परस्पर विरोधी चित्र; आधी फेटा बांधला, आता राम शिंदे, रोहित पवारांनी एकमेकांकडे पाहिलंही नाही!
राम शिंदे आणि रोहित पवारांचे दोन परस्पर विरोधी फोटो
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 6:05 PM

अहमदनगर : कर्जत नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी रोहित पवार यांच्या खेळीनं राम शिंदेंना मोठा झटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. रोहित पवार यांनी दबाव टाकून ऐनवेळी भाजपच्या उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप करत राम शिंदे यांनी संत शिरोमणी गोदड महाराज मंदिरासमोर ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. अशावेळी रोहित पवार यांनीही दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावली. पण यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडे साधं पाहिलंही नाही. या पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला राजकारणातील परस्पर विरोधी चित्र इथं दाखवणार आहोत.

कर्जत नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. अशावेळी राम शिंदे यांना मोठा धक्का बसला. रोहित पवार यांच्या खेळीमुळे भाजप शहराध्यक्ष वैभव शहा यांची पत्नी राखी शहा यांच्यासह नीता कचरे, पूजा कचरे, नजमा बागवान, सुनंदा पिसाळ या भाजप उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. भाजपच्या उमेदवारांवर दबाव आणून त्यांना अर्ज मागे घ्यायला लावला जात असल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. यावरुन शिंदे आणि निवडणूक अधिकारी यांच्या शाब्दिक चकमकही झाली. त्यानंतर शिंदे यांनी कर्जतचं ग्रामदैवत असलेल्या गोधड महाराजांच्या मंदिरासमोर ठिय्या आंदोलन सुरु केलं.

Ram Shinde and Rohit Pawar 2

राम शिंदे आणि रोहित पवारांनी एकमेकांकडे पाहणं टाळलं

रोहित पवार आणि राम शिंदेंनी एकमेकांकडे पाहणं टाळलं!

राम शिंदे हे आपल्या समर्थकांसह मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या चौथऱ्यावरच ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. शिंदे यांच्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार रोहित पवारही गोधड महाराज मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले. यावेळी मंदिरात जाताना आणि दर्शन घेऊन येत असताना रोहित पवार यांनी शिंदे यांच्याकडे पाहिलंही नाही. तर शिंदे यांनीही रोहित पवारांकडे पाहणं टाळलं. त्यानंतर शिंदे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला. विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे आणि पवार यांच्याकडून कुरघोडीचं राजकारण सुरुच आहे. आता कर्जत नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे राजकारण अधिक तापलेलं दिसत आहे.

Ram Shinde and Rohit Pawar 1

राम शिंदे आणि रोहित पवारांनी एकमेकांकडे पाहणं टाळलं

राम शिंदेंनी रोहित पवारांना फेटा बांधला होता

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत राम शिंदे यांचा पराभव झाल्यानंतर कर्जत-जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला होता. निवडणुकीदरम्यान जोरदार आरोप-प्रत्यारोप आणि टीकाटिप्पणी झाली. मात्र, निकालानंतर रोहित पवार यांनी थेट राम शिंदे यांचं घर गाठलं होतं. त्यावेळी शिंदे यांनीही रोहित पवारांचं स्वागत करत, विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं होतं. इतकंच नाही तर शिंदे यांनी स्वत: रोहित पवारांना फेटा बांधला होता. तर रोहित पवारांनी शिंदे यांच्या आईंचे आशीर्वाद घेतले होते. त्यावेळी राजकारणातील हे दुर्लभ चित्र पाहून राज्यभरात रोहित पवार आणि राम शिंदे यांचं कौतुक झालं होतं. मात्र, विधानसभा निवडणुक निकालाचा दिवस ते आजचा दिवस पाहिला तर राजकारणातील परस्परविरोधी चित्र आज कर्जतमध्ये पाहायला मिळालं.

Ram Shinde and Rohit Pawar 3

राम शिंदे आणि रोहित पवारांचा विधानसभा निवडणूक निकालानंतरचा फोटो

इतर बातम्या :

St worker strike : कामावर हजर न राहिलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बडतर्फ प्रक्रियेला सुरुवात-सूत्र

कोरेगाव भीमाच्या विकासाठी 100 कोटी, शौर्य दिनाचा कार्यक्रम राज्य सरकार पार पाडणार; धनंजय मुंडेंची मोठी घोषणा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.