कर्नाटकात भाजप पिछाडीवर; पराभवाची 6 महत्वपूर्ण कारणं, वाचा सविस्तर…

Karnataka Assembly Election Results 2023 Counting Update : कर्नाटकात भाजप का पिछाडीवर? वाचा पराभवाची 6 कारणं...

कर्नाटकात भाजप पिछाडीवर; पराभवाची 6 महत्वपूर्ण कारणं, वाचा सविस्तर...
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 1:16 PM

बंगळुरू : कर्नाटक निवडणुकीची आज मतमोजणी होतेय. यात काँग्रेसने सकाळपासूनच आपली आघाडी कायम ठेवली आहे. भाजप पिछाडीवर आहे. काँग्रेस 129 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 66 जागांवर आघाडीवर आहे. जेडीएस 21 वर पुढे आहे. तर अपक्ष आणि इतर 7 जागांवर आघाडीवर आहेत. काँग्रेस आघाडीवर असल्याने काँग्रेसला बहुमताचा आकडा पार केलेला आहे. अशात सत्तेत असणारं भाजप मागे का पडलं? भाजपच्या पराभवाची कारणं काय? याची चर्चा होतेय. पाहुयात भाजपच्या पराभवाची सहा मोठी कारणं…

1. मजबूत चेहऱ्याचा अभाव

कर्नाटकात भाजपने मागच्यावेळी बी. एस. येडियुरप्पा यांना डावलत भाजपने बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री केलं. पण बोम्मई कर्नाटकच्या जनतेवर आपल्या कामाची विशेष छाप पाडू शकले नाहीत. आताही भाजपने बोम्मई यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढली. परिणाम निवडणुकीच्या निकालावर दिसतोय. भाजपचा पराजयाच्या जवळ दिसत आहे.

2. भ्रष्टाचार

कर्नाटकात या विधानसभा निवडणुकीत भ्रष्टाचाराचा मुद्दा महत्वाचा राहिला. काँग्रेसने वारंवार भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे केला. एस. ईश्वरप्पा यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर एका आमदाराला तुरूंगातही जावं लागलेलं. भ्रष्टाचाराचा मुद्दा कर्नाटकात महत्वपूर्ण राहिला.

3. राजकीय समीकरणं जुळवण्यात अपयशी

भाजप जातीय समिकरणं जुळवून आणण्यात अयशस्वी ठरलं. लिंगायत, दलित, आदिवासी, ओबीसी, वोक्कलिंगा या समाजाला जवळ करण्यात भाजपला यश आलं नाही. तर दुसरीकडे काँग्रेस मुस्लिम, दलित ओबीसी समाजाची मनं जिंकण्यात यशस्वी झाली. त्यामुळे त्यांचा विजय झाला.

4. धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा :

कर्नाटकात भाजपने हलाल, हिजाब, अजान या सारखे मुद्द्यांवर थेट भाष्य केलं. काँग्रेसने बजरंग दलवर बंदी घालण्याचं अश्वासन दिलं. तर भाजपने बजरंग दलाचा थेट बजरंग बलीशी संबंध जोडला. अन् हा थेट बजरंग बली अपमान असल्याचं म्हटलं. पण भाजपचं हे हिंदू कार्ड लोकांना पचनी पडलेलं दिसत नाही.

5. येडिरप्पा साईडलाईन

कर्नाटकात भाजपला तळागाळापर्यंत पोहोचवण्यात ज्याचा मोठा वाटा राहिला त्या बी. एस. येडियुरप्पा यांना भाजपने बाजूला ठेवलं. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांची तिकीटं भाजपने कापली. त्यांनी काँग्रेससोबत जात निवडणुकीच्या मैदानात उतरले. हे तिघेही लिंगायत समाजाचे बडे नेते आहेत. त्यांना बाजूला करणं भाजपला महागात पडलं.

6. अँन्टी इन्क्मबन्सी

भाजपची कर्नाटकात सत्ता होती. पण या सरकारवर जनतेची नाराजी होती. ही नाराजी भाजप दूर करू शकलं नाही. अँन्टी इन्क्मबन्सीचा मोठा फटका भाजपला मतदानात बसला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.