करोडोंची संपत्ती, भ्रष्टाचाराचे आरोप अन् साडे तीन महिने तुरूंगवास; कोण आहेत डी के शिवकुमार?

Karnataka Assembly Election Results 2023 Counting Update : काँग्रेसला पुन्हा सत्तेचा नवा आशावाद दाखवणारे डी के शिवकुमार यांचा राजकीय इतिहास काय? वाचा सविस्तर...

करोडोंची संपत्ती, भ्रष्टाचाराचे आरोप अन् साडे तीन महिने तुरूंगवास; कोण आहेत डी के शिवकुमार?
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 2:52 PM

Karnataka Assembly Election Results 2023 Counting Update : कर्नाटकात निवडणूक होतेय. यात काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेस 134 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपला 67 जागांवर समाधान मानावं लागत आहे. जेडीएस 19 जागांवर पुढे आहे. तर अपक्ष आणि इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत. 2014 ला काँग्रेसची केंद्रातली सत्ता गेली अन् तेव्हापासूनच काँग्रेसला अपयश यायला लागलं. पण कर्नाटकच्या आजच्या निकालांमुळे काँग्रेसला पुन्हा नवा आशावाद मिळाला आहे.

कर्नाटकात काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला आहे. त्यामुळे कर्नाटकासह देशातही काँग्रेसचा आशावाद वाढला आहे. काँग्रेसच्या या यशात डी के शिवकुमार यांचा मोठा वाटा राहिला. काँग्रेसचं सत्तेत आल्यास डी के शिवकुमार मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असू शकतात. 22 वर्षांनंतर कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येत आहे. काँग्रेसला नवी उमेद देणारे डी के शिवकुमार नक्की कोण आहेत? पाहूयात…

डी के शिवकुमार कोण आहेत?

डी के शिवकुमार हे सध्या काँग्रेसचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते गांधी कुटुंबाच्या जवळचे मानले जातात. यंदा कर्नाटकात काँग्रेची सत्ता येण्याची चिन्हे आहेत. तसं झाल्यास डी के शिवकुमार हे मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार असू शकतात. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सिद्धरामय्या हेदेखील आहे. पण डी के शिवकुमार यांचं पारडं जड असल्याचं बोललं जातंय.

डी के शिवकुमार हे राजकारणी तर आहेतच पण शिक्षण क्षेत्र आणि सामाजिक कार्यकर्यातही त्यांचा सहभाग राहिला आहे. 2006 मध्ये कर्नाटक स्टेट ओपन युनिव्हर्सिटी म्हैसूरमधून त्यांनी राज्यशास्त्र विषयात MA केलं आहे.

डी के शिवकुमार यांनी त्यांचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या कनकपुरा इथून निवडणूक लढवली आहे. कनकपुरा मतदारसंघाचे ते आठ वेळा आमदार राहिले आहेत. कनकपुरामध्ये यंदा कर्नाटकचे महसूल मंत्री आर. अशोक यांनी डी के शिवकुमार यांच्याविरोधात निवडणूक लढवली. डी के शिवकुमार यांनी आर. अशोक यांचा पराभव केला आहे.

शेकडो कोटींची संपत्ती तपास यंत्रणांचा ससेमिरा अन् अटकेची कारवाई

डीके शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसमधील सर्वात श्रीमंत नेते आहेत. त्यांच्याकडे 840 कोटींहून अधिकची संपत्ती आहे. जेव्हा-जेव्हा काँग्रेस पक्षाला निधीची गरज भासते, तेव्हा शिवकुमार तिथे खंबीरपणे उभे राहतात. त्यामुळे त्यांना ‘संकटमोचक’ म्हटलं जातं.

सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग त्यांची चौकशी करत आहे. कर्नाटक निवडणुकीआधी 104 दिवस ते तुरुंगात होते. आता सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. डी. के. शिवकुमार यांच्यामुळे काँग्रेसला नवा आशावाद मिळाला आहे. काँग्रेसला अच्छे दिन येण्याची ही सुरूवात असल्याचं काँग्रेसचे नेते म्हणत आहेत.

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.