बसवराज बोम्मई बैठक घेत होते अन् इतक्यात सापाची एन्ट्री; पुढे काय घडलं? वाचा सविस्तर…
Karnataka Assembly Election Results 2023 Counting Snake News : एकीकडे कर्नाटक निवडणुकीची मतमोजणी सुरू अन् दुसरीकडे भाजपच्या बैठकीत घुसला साप!; वाचा सविस्तर नेमकं काय घडलं?
Karnataka Assembly Election Results 2023 : कर्नाटकात निवडणूक होतेय. 10 तारखेला मतदान पार पडल्यानंतर आज मतमोजणी होतेय. यात पहिल्या कलांमध्ये कर्नाटकच्या जनतेची काँग्रेसला पसंती मिळताना दिसतेय. काँग्रेसचे 114 उमेदवार आघाडीवर आहेत. तर भाजपचे 73 उमेदवार पुढे पाहायला मिळत आहेत. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्वपूर्ण बैठक पार पडतेय. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वात ही बैठक होतेय. पण या बैठकीच्या ठिकाणी अचानकपणे साप घुसला आहे.
भाजपचे उमेदवार शिवराज सज्जन यांच्या घरात भाजपची बैठक सुरू होती. या बैठकीला भाजपचे इतरही नेते उपस्थित होते. या बैठकीला उपस्थित होते. अशात शिवराज सज्जन यांच्या घरात साप घुसला. याची माहिती मिळताच सुरक्षा रक्षकांनी या सापाला बाहेर काढलं.
शिवराज सज्जन यांच्या घरात साप घुसल्याने गोंधळातं वातावरण पाहायला मिळालं. पण सुरक्षारक्षकांनी काहीच वेळात या सापाला बाहेर काढलं अन् वातावरण शांत झालं.
#WATCH Karnataka CM Basavaraj Bommai reaches the BJP camp office in Shiggaon, a snake found in the building compound slithers away
The snake was later captured and the building compound secured pic.twitter.com/FXSqFu0Bc7
— ANI (@ANI) May 13, 2023
काँग्रेस बहुमतापासून अवघ्या काही जागा दूर आहे. 114 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. भाजपा 73, जेडीएस 30 तर इतर 5 जागांवर आघाडीवर आहे. अशात आपल्या नेत्यांना राजकीय दृष्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. विजयी उमेदवारांना काँग्रेस हैद्राबादला सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार असल्याची माहिती आहे.
निपाणी मतदारसंघात भाजपच्या शशिकला जोल्ले यांची आघाडी कायम आहे. तर राष्ट्रवादीचे उत्तम पाटील 3500 मतांनी पिछाडीवर आहेत.
कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा रिसॉर्ट पॉलिसी!
कर्नाटक विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेस अलर्ट मोडवर आहे. डी के शिवकुमार यांना हायकमांडकडून फोन आल्याची माहिती आहे. सर्व आमदारांना एकत्रित ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कर्नाटक राज्याच्या राजकारणात पुन्हा रिसॉर्ट पॉलिसीचा अवलंब होणार आहे. काँग्रेसकडून सर्व आमदारांना एकाच रिसॉर्टमध्ये ठेवलं जाणार आहे. 2019 च्या निवडणुकीप्रमाणे पुन्हा रिसॉर्ट पॉलिसीची जबाबदारी डिके शिवकुमार यांच्याकडे आहे.