‘हे’ जरा आमच्या नेत्यांचं चुकलंच!; कर्नाटक निवडणुकीतील पराभवावर भाजप नेत्याची प्रतिक्रिया

BJP Lost Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटकच्या निवडणुकीतील पराभवावर भाजप नेत्याची प्रतिक्रिया थेट प्रतिक्रिया; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इमेजवरही भाष्य

'हे' जरा आमच्या नेत्यांचं चुकलंच!; कर्नाटक निवडणुकीतील पराभवावर भाजप नेत्याची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 3:45 PM

Karnataka Assembly Election Results 2023 Counting Update : कर्नाटकात काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेस 136 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपला 65 जागांवर समाधान मानावं लागत आहे. जेडीएस 19 जागांवर पुढे आहे. तर अपक्ष आणि इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत. कर्नाटकमध्ये भाजपचा दारूण पराभव का झाला? भाजपच्या परभवा मागची कारणं काय? यावर भाजपचे नेते संजय काकडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कर्नाटकात काँग्रेसचा विजय झालाय. तर भाजपचा दारूण पराभव झाला आहे. यावर भाजपचे नेते संजय काकडे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. “स्थानिक पातळीवर निर्णय चुकले असावेत, असं मला वाटतं. हा पराभव आम्ही लोकसभा निवडणुकीत भरून काढू”, असं संजय काकडे म्हणाले आहेत. कर्नाटकच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते. पण तिथे स्थानिक पातळीवरचे निर्णय चुकले. याचा अर्थ मोदीसाहेबांना करिश्मा कमी झाला असं होत नाही, असंही ते म्हणालेत.

स्थानिक निवडणुका चेहऱ्यावर असतात. आम्ही योग्य उमेदवार द्यायला चुकलो असेल. अमित शाह आणि मोदी या पराभवाला जबाबदार आहेत, असं नाही. कारण लोकसभेचा चेहरा वेगळा असतो. विधानसभेचा चेहरा वेगळा असतो. ही देश पातळीची निवडणूक नाही, असंही काकडे म्हणालेत.

मतदानाची टक्केवारी बघितली तर आमचं मतदान मागच्या वेळेपेक्षा फार कमी झालेली नाही. 2017 ला राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडला काँग्रेस आलं पण लोकसभेला मात्र भाजप निवडून आली. त्यामुळे केंद्रातील आणि राज्यातील गणितं वेगळी असतात.

स्थानिक नेत्यांनी आम्ही चुकलो, कमी पडलो. असं मान्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीला आम्ही निवडून येऊ. ही चूक भरून काढू, असं म्हणत संजय काकडे यांनी कर्नाटक निवडणुकीसह आगामी लोलसभा निवडणुकीवर भाष्य केलंय.

अमित शाह-मोदी फक्त प्रचाराला गेले होते. नरेंद्र मोदी यांचा करिश्मा आणि अमित शाह यांचं प्लॅनिंग या पराभवाला जबाबदार नाही, असं काकडे म्हणालेत.

प्रचाराचा मुद्दा बजरंगबली नाही, तो गैरसमज झाला, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.