Karnataka bypolls : कर्नाटकात 15 जागांसाठी पोटनिवडणूक, भाजपला 8 जागी विजय आवश्यक!

कर्नाटक विधानसभेच्या 15  मतदारसंघात पोटनिवडणूक (Karnataka bypolls) होत आहे. आज या 15 जागांसाठी मतदान पार पडत आहे. 15 जागांसाठी 165 जण आपले नशीब आजमावत आहेत.

Karnataka bypolls : कर्नाटकात 15 जागांसाठी पोटनिवडणूक, भाजपला 8 जागी विजय आवश्यक!
Follow us
| Updated on: Dec 05, 2019 | 10:59 AM

बंगळुरु : कर्नाटक विधानसभेच्या 15  मतदारसंघात पोटनिवडणूक (Karnataka bypolls) होत आहे. आज या 15 जागांसाठी मतदान पार पडत आहे. 15 जागांसाठी 165 जण आपले नशीब आजमावत आहेत. महत्त्वाचं म्हणजे या 15 पैकी 8 मतदारसंघात भाजपला विजय मिळवणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास कर्नाटकातील येडीयुरप्पांच्या नेतृत्त्वातील भाजप सरकार कोसळू शकतं. इथे पुन्हा काँग्रेस आणि जेडीएस सत्ता स्थापनेचा दावा करु शकतात. (Karnataka bypolls)

विधानसभेचे सभापती रमेश कुमार यांनी जुलै 2019 मध्ये मोठा निर्णय घेत काँग्रेस- जेडीएसच्या 14 बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द केले. त्याआधी तिघांना निलंबित करण्यात आलं होतं. महत्त्वाचं म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी 17 जणांना अपात्र ठरवत निवडणूक लढण्यास मज्जाव केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात निकाल देताना या 17 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कायम ठेवताना त्यांना दिलासा दिला होता. हे आमदार पुन्हा निवडणूक लढवू शकतील असं नमूद केलं होतं.

आज ज्या 15 जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे, त्या जागांवर भाजपने जे काँग्रेस-जेडीएसचे आमदार अपात्र ठरले होते, त्यांना आपल्याकडे खेचून उमेदवारी दिली आहे. मात्र काँग्रेस-जेडीएसची  युती तुटल्याने 15 फुटीर आमदारांना पराभूत करण्याचा चंग दोन्ही पक्षांनी बांधला आहे.

दुसरीकडे या आमदारांना निवडून आणण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद लावली आहे. मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी अपात्र आमदारांच्या विजयासाठी सर्व मतदारसंघात प्रचार सभा आणि रोड शो करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. येडीयुरप्पा यांनी गेल्या दोन आठवड्यात 15 मतदारसंघात प्रचार केला असून, पाच हजार किलोमीटरचा प्रवास केला.

या सर्व पार्श्वभूमीवर तिन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीच्या निकालावर  सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. सत्ताधारी भाजपला किमान आठ जागा जिंकाव्या लागणार असून, त्यांना रोखण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसनेही जोर लावला आहे.

या मतदारसंघात मतदान 

गोकाक, अथणी, कागवाड, शिवाजीनगर, यशवंतपूर, महालक्ष्मी लेआउट ,के .आर. पूरम, होसकोटे, चिक्कबळळापूर, विजयनगर, हिरेकेरुर, राणीबेन्नूर, हुनसूर,  यल्लापूर या मतदारसंघात आज मतदान होत आहे.

बेळगाव जिल्ह्यात तीन ठिकाणी मतदान

कर्नाटकातील पोटनिवडणुकीसाठी बेळगाव जिल्ह्यातील तीन मतदारसंघात मतदान होत आहे . बेळगाव जिल्ह्यातील गोकाक,कागवड आणि अथणी या तीन मतदारसंघात मतदान होत आहे. यासाठी 771 मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली असून 6 लाख 25 हजार 548 मतदान हक्क बजावणार आहेत. गोकाकमध्ये 288, कागवाडमध्ये  231 आणि अथणी मतदारसंघात 260 मतदान केंद्र आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणूक

कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी गेल्या वर्षी निवडणुका झाल्या. या निवडणुकीत  भाजप 104, काँग्रेस 80 आणि जेडीएसला 37 जागा मिळाल्या होत्या. त्यात भाजप पहिल्या क्रमांचा पक्ष ठरला होता, मात्र काँग्रेस आणि जेडीएस एकत्र येऊन त्यांनी सत्ता स्थापन केली. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जेडीएसचे कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.  इथे सत्ता स्थापनेसाठी 113 जागांची गरज आहे.

कर्नाटकातील पक्षीय बलाबल

कर्नाटक विधानसभेत एकूण 225 जागा आहेत, तर एक नामांकित सदस्य आहे. बहुमतासाठी 113 जागांची आवश्यकता आहे. काँग्रेस 80 जेडीएस 37, केपीजेपी 1, बसपा 1 आणि 1 अपक्ष अशा 120 आमदारांसह सध्या काँग्रेस-जेडीएसची सत्ता आहे. भाजपचे 104 आमदार निवडून आले होते. त्यामुळे भाजपला आणखी किमान दहा आमदारांची आवश्यकता आहे. आपल्याला 120 आमदारांचा पाठिंबा असल्यामुळे सरकारला कोणताही धोका नसल्याचं कुमारस्वामींनी यापूर्वी म्हटलं होतं.

दोन दिवसात येडियुरप्पांचा राजीनामा

गेल्या वर्षी कर्नाटकात 224 जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 105 जागा मिळवल्या. काँग्रेसला 80 आणि जेडीएसला 37 जागांवर विजय मिळाला. 17 मे 2018 रोजी भाजपचे नेते बीएस येदियुरप्पा यांनी सत्तास्थापनेचा दावा केला आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण येदियुरप्पा बहुमत सिद्ध करु न शकल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. 19 मे 2018 रोजी येदियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएस यांनी सत्ता स्थापन केली. कुमारस्वामी यांना आश्चर्यकारकरित्या पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली.

काँग्रेसने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जेडीएसला मुख्यमंत्रीपद दिलं खरं, पण काँग्रेसचेच अनेक आमदार नाराज झाले. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांच्या गटाने अनेकदा बंडखोरीचीही भाषा केली. शिवाय हे सरकार चालवताना कुमारस्वामी यांनी अनेकदा हतबलताही व्यक्त केली होती.

अखेर पुन्हा एकदा कर्नाटकात राजकीय संकट ओढावलं आणि 6 जुलैला काँग्रेस-जेडीएसच्या 12 आमदारांनी राजीनामा दिला. हा आकडा आणखी वाढतच गेला आणि एकूण 16 आमदार सत्ताधारी पक्षापासून दूर झाले. त्यात दोन अपक्षांनीही भाजपला पाठिंबा दिला.

संबंधित बातम्या 

कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसचे 17 आमदार अपात्रच, सुप्रीम कोर्टाचा निर्णय 

कर्नाटकात राजकीय भूकंप, उपमुख्यमंत्र्यांसह 32 मंत्र्यांचे राजीनामे 

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.