Karnataka : कर्नाटकची सातत्याने कुरघोडी, नवनवीन घोषणांनी सीमाभागातील गावांना लागली कानडी गोडी, पण हा खटाटोप चाललाय कशासाठी?

Karnataka : या कानडी रागामागे सूर तरी नेमके कशाचे आहेत..कशामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री अतितायीपणा करत आहेत..

Karnataka : कर्नाटकची सातत्याने कुरघोडी, नवनवीन घोषणांनी सीमाभागातील गावांना लागली कानडी गोडी, पण हा खटाटोप चाललाय कशासाठी?
सीमावाद का उकरून काढला?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 03, 2022 | 10:26 PM

मुंबई : कर्नाटक सरकारच्या (Karnataka Government) अतितायीपणामुळे सीमावर्ती भागात हायहोल्टज् ड्रामा सुरु आहे. दररोज नवनवीन घोषणा, कुरापती काढत कर्नाटकने महाराष्ट्र सरकारच्या डोक्याला भलताच ताप दिला आहे. कर्नाटक सरकारने विकासाच्या घोषणांचा पाऊसच पाडला नाहीतर, पाणी सोडण्याच्या कृतीतून सीमावर्ती भागातील (Border Village) गावकऱ्यांना बंडासाठीही भरीस पाडले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक राजकीय प्रश्न बाजूला फेकल्या गेले असून सीमावर्ती भागातील कानडी राग थोपविण्याची मोठी जबाबदारी राज्य सरकारवर येऊन पडली आहे. कर्नाटक सरकारने आळवलेल्या या कानडी रागाचे सूर नेमके काय आहे, का कर्नाटक सरकार असा डावपेच खेळत आहे?

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सीमावर्ती भागावर कर्नाटक सरकारने दावा ठोकला आहे. जत तालुक्यातील 40 गावांवर त्यांनी अगोदर हक्क सांगितला. त्यानंतर अक्कलकोटसह सोलापूर जिल्ह्यावरच दावा ठोकला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी याविषयीचे विधान केले होते.

बोम्मई यांनी दोन दिवसांपूर्वी सीमावर्ती भागातील कन्नड शाळांना विशेष अनुदान देण्याचीही घोषणा केली होती. एवढेच नाहीतर ज्या कन्नड भाषिकांनी गोवा मुक्तीसाठी, स्वातंत्र्य लढ्यासाठी आणि एकीकरण चळवळीसाठी योगदान दिले, त्यांना पेन्शन लागू करण्याची घोषणा केली.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर कर्नाटकने बुधवारी पुन्हाआगळीक केली. सीमाप्रश्नावरुन महाराष्ट्राला डिवचण्यासाठी कर्नाटकने जत पूर्व भागात पाणी सोडले. तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी ओढापात्रातून सोडले. त्यामुळे या पट्यातील तिकोंडी येथील साठवण तलाव एका दिवसात तुडुंब भरला. बोम्मईंनी थेट लोकभावनेलाच हात घातला.

सीमावर्ती भागात सातत्याने विकास कामांना खोडा घातल्याचा मोठा फटका दिसून येत आहे. सरकारी उदासीनतेमुळे रस्ते, पाणी, वीजेसह पायाभूत सुविधांचा मोठा अभाव या भागात दिसून येतो. त्याचाच फायदा कर्नाटक सरकार उठवत आहे.

दरम्यान शनिवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा महाराष्ट्राला डिवचले. ऑक्टोबर महिन्यात त्यांनी महाराष्ट्रात कर्नाटक भवन उभारण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यानंतर आज त्यांनी सोलापुरात कर्नाटक भवन उभारण्याची घोषणा केली. संघटनांच्या मागणीनंतर ही घोषणा केल्याचा दावा त्यांनी केला.

कर्नाटक भवनासाठी 10 कोटींचा निधींची तरतूद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंढरपुरमध्येही कर्नाटक यात्रा भवन उभारण्यात येणार आहे. कर्नाटकच्या यात्रेकरुंसाठी तुळजापुरात यात्रा भवन उभारण्याची घोषणाही बोम्मई यांनी केला. तर महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात येण्यास मज्जाव केला आहे.

आता कर्नाटक सरकार सीमावर्ती भागात ही मेहरबानी कशासाठी करत आहे, असा सवाल तुम्हालाही पडला असेल. तर कर्नाटकात निवडणूका तोंडावर आल्या आहेत. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला कर्नाटकात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याने कर्नाटक सरकार बिथरल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.