Karnataka Election Results 2023 : कर्नाटकच्या विजयानंतर आता कॉंग्रेसच्या हाथाला किती राज्यांची साथ ?

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेचा कर्नाटकात तरी फायदा झालेला दिसत आहे. देशातील सर्वात जुन्या पक्षाची आता देशातील किती राज्यात सत्ता आहे ते पाहूया...

Karnataka Election Results 2023 : कर्नाटकच्या विजयानंतर आता कॉंग्रेसच्या हाथाला किती राज्यांची साथ ?
cong-rahul-soniaImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: May 14, 2023 | 3:40 PM

मुंबई : कर्नाटकात मिळालेल्या प्रचंड मोठ्या विजयाने कॉंग्रेसचा आत्मविश्वास दुणावला आहे. आता कॉंग्रेसला येऊ घातलेल्या निवडणूकांमध्येही हा यशाचा पॅटर्न लागू करायचा आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूकात 136 जागा मिळाल्याने कॉंग्रेसचे बहुमतात सरकार येत आहे. आता कॉंग्रेसला हिमाचल प्रदेशनंतर कर्नाटकात मिळालेल्या एकहाती सत्ता मिळाल्याने यावर्षअखेर होऊ घातलेल्या राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड याराज्यांसह पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणूकासाठी बळ मिळाले आहे.

दक्षिण भारतातील या विजयाने कॉंग्रेस पार्टीची सत्ता आता एकूण सात राज्यात झाली आहे. ज्या चार राज्यात कॉंग्रेस स्वत:च्या बळावर सत्तेत आहे त्यात हिमाचल प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि आता कर्नाटक यांचा समावेश झाला आहे. या शिवाय बिहार, झारखंड आणि तामिळनाडूमध्ये कॉंग्रेस सहकारी पक्षाच्या मदतीने स्थापन केलेली सरकारे आहेत. आता त्या राज्यावर एक नजर टाकूया …

हिमाचल प्रदेश : कर्नाटक विधानसभा निवडणूकांच्या आधी कॉंग्रेसने हिमाचल प्रदेशातील निवडणूका जिंकल्या होत्या. 68 जागा असलेल्या हिमाचल प्रदेशात कॉंग्रेसला 45 जागा मिळाल्या. भाजपाला येथे केवळ 25 जागांवरच विजय प्राप्त करता आला.

राजस्थान : राजस्थानात यावर्षअखेर निवडणूका आहेत, साल 2018 मध्ये राजस्थानात कॉंग्रेस पार्टीला 100 जागांवर विजय मिळाला होता. त्यावेळी वसुंधरा राजे यांचे सरकार होते. आणि सचिन पायलट कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते, राजस्थानात आता दोन गट पडले असून सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्या संघर्ष पेटला आहे.

छत्तीसगड : राजस्थानप्रमाणे साल 2018 मध्ये छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसची सत्ता आली. 90 सदस्य असलेल्या छत्तीसगड विधानसभेत कॉंग्रेसला 68 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपाला केवळ 15 जागांवर समाधान मानावे लागले.

बिहार : बिहारमध्ये कॉंग्रेसचे आघाडीचे सरकार आहे. राज्यात 2020 मध्ये निवडणूका झाल्या होत्या. तेव्हा भाजपा आणि जदयूचे आघाडी सरकार होते. त्यांनी निवडणूका जिंकल्याही परंतू साल 2022 मध्ये नितीश कुमार यांनी राजद यांच्याशी घरोबा केला तेव्हा कॉंग्रेस देखील या सरकारमध्ये सामील झाली. त्यांना दोन मंत्रीपदे दिली आहेत.

तामिळनाडू : येथे 2019 मध्ये करूणानिधी आणि जयललिता यांच्या पश्चात झालेल्या पहिली निवडणूकीत डीएमकेला 133 जागा तर कॉंग्रेसला 18 जागा मिळाल्या.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.