कसबा पेठ भाजपसाठी कठीणच, नाराजीनाट्य संपता संपेना, गिरीश बापट नाराज, फडणवीसांकडूनही मनधरणी, पण…!
गिरीश बापट नाराज असतील तर याचा फटका भाजपला बसणार हे नक्की मानलं जात आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते संजय काकडे देखील प्रचारापासून लांब असल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
अभिजित पोते, पुणेः कसबा पेठ (Kasba Peth) आणि पिंपरी चिंचवड (Chinchwad) पोट निवडणुका (By Election) भाजपसाठी आव्हानात्मक ठरणार असं म्हटलं जातंय. तसे सर्वेही सांगतायत. निवडणुकीच्या या आखाड्यात भाजप दिग्गज नेत्यांचंही बळ आजमावण्याची संधी एकही संधी सोडत नाहीये. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांची उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपासमोर टिळकांची नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान होतं. ती नाराजी दूर झाली. टिळकवाड्यातून केसरीवाड्यातूनच भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे पुण्यात ठाण मांडून बसलेत. पण भाजप उमेदवार हेमंत रासणे यांच्या प्रचारसभांमध्ये गिरीश बापट यांची गैरहजेरी सर्वांच्या नजरेत भरतेय.
कसबा पेठेतील गिरीश बापट हे प्रचारसभांपासून दूर का राहतायत, यावरून चर्चा सुरु झाली आहे. त्यांच्या नाराजीमागे एक प्रमुख कारणही चर्चेत आहे.
‘या’ कारणामुळे नाराजी?
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत नाराजी नाट्य भाजपाची पाठ सोडायला तयार नाही. भाजपच्या प्रचारसभांमध्ये गिरीश बापट दिसत नाहीयेत. प्रकृतीच्या कारणास्तव आपण प्रचारात सहभागी होऊ शकत नाहीत, असं पत्र त्यांनी लिहिलंय. पण या नाराजीचं कारण काही वेगळच आहे, अशी चर्चा सुरु आहे.
खरंतर कसबा विधानसभेसाठी गिरीश बापट हे आपल्या सुनेला उमेदवारी देण्यासाठी आग्रही असल्याची देखील बातमी आली होती. पण तसं न झाल्याने गिरीश बापट प्रचारापासून लांब आहेत असं बोललं जात आहे.
फडणवीस यांच्याकडून मनधरणी
गिरीश बापट यांची प्रकृती बरी नसल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही विचारणा झाली आहे. फडणवीस यांनी गिरीश महाजन यांची नुकतीच भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूसही केली. या बैठकीत फडणवीस यांनी गिरीश बापट यांची नाराजी दूर करण्याचा प्रय
नाराजीचा फटका बसणार?
कसबा पेठ मतदार संघातून ते सहा वेळा आमदार राहिले आहेत. त्यामुळे कसब्यात गिरीश बापट यांचं मोठं वलय आहे. जर यावेळी गिरीश बापट नाराज असतील तर याचा फटका भाजपला बसणार हे नक्की मानलं जात आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते संजय काकडे देखील प्रचारापासून लांब असल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
संजय काकडेंची नाराजी दूर
दरम्यान, कसबा पेठ निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस यांची एंट्री झाल्यामुळे संजय काकडे यांची नाराजी दूर झाल्याची चिन्ह आहेत. ते आज पासून प्रचारसभांमध्ये सहभागी होतील, असं सांगण्यात येतंय. तर खासदार गिरीश बापट हे मतदारांना आवाहन करतानाचा व्हिडिओ जारी केला जाईल, असं म्हटलं जातंय.