KDCC Bank Chairman Election : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड, हसन मुश्रीफ आणि पी एन पाटील यांची नावं आघाडीवर

आज कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची (KDCC Bank Chairman Election) आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड पार पडणार आहे.  दुपारी तीन वाजता निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

KDCC Bank Chairman Election : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड, हसन मुश्रीफ आणि पी एन पाटील यांची नावं आघाडीवर
Satej Patil P N Patil Hasan Mushrif
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 10:27 AM

कोल्हापूर : राज्यातील जिल्हा बँक निवडणुकांची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीमुळं राजकीय वातावरण तापलेलं आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्या पॅनेलनं विजय मिळवला आहे. त्यांच्यापुढं शिवसेनेच्या वतीनं निवडणुकीत आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शिवसेनेला यश मिळालं नाही. आज कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची (KDCC Bank Chairman Election) आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड पार पडणार आहे.  दुपारी तीन वाजता निवड प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस आमदार पी.एन पाटील यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे. तर, उपाध्यक्षपदासाठी आमदार राजीव आवळे आणि श्रुतिका काटकर यांची नाव चर्चेत आहे.

जिल्हा बँकेचं अध्यक्षपद कुणाला? हसन मुश्रीफ की पी.एन.पाटील

कोल्हापूर जिल्हा बँकेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस आमदार पी.एन.पाटील यांची नावं आघाडीवर आहेत.हसन मुश्रीफ आणि पी.एन.पाटील यांच्यापैकी कोणत्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे आज ठरणार आहे. हसन मुश्रीफ, पी.एन.पाटील की ऐनवेळी तिसऱ्याचं व्यक्तीचं नाव जिल्हा बँकेचं अध्यक्षपद निश्चित केलं जाणार हे पाहावं लागणार आहे.

उपाध्यक्ष कोण असणारं?

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदासाठी आमदार राजीव आवळे आणि श्रुतिका काटकर यांची नाव चर्चेत आहे.अध्यक्ष उपाध्यक्ष नाव निश्चितीसाठी सत्तारूढ गटाच्या नेत्यांची सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. दरम्यान जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी सत्ताधारी गटाला आमदार विनय कोरे यांची समजूत काढण्यात यश येणार का हे पाहावं लागणार आहे.

कोल्हापूर जिल्हा बँक राजकीय चित्र

कोल्हापूर जिल्हा बँकेतील सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीनं निवडणूक झालेल्या 15 जागांपैकी 11 जागा मिळवल्या होत्या. राजेंद्र पाटील-यड्रावकर,राजू आवळे,विनय कोरे,सुधीर देसाई,संतोष पाटील,रणजितसिंह पाटील,भैया माने,स्मिता गवळी,निवेदिता माने,श्रुतिका काटकर,विजयसिंह माने हे विजयी झाले आहेत. तर, बिनविरोध विजयी झालेल्या पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी.एन.पाटील, आमदार राजेश पाटील, माजी आमदार अमल महाडिक आणि ए. वाय. पाटील यांच्या जागा आणि निवडणुकीतील 11 जागा अशा एकूण 17 जागांसह हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी बँकेवर वर्चस्व मिळवलं होतं. तर विरोधी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीला तीन जागा मिळाल्या तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.

इतर बातम्या:

Video | नागपूरमध्ये 350 पोलीस कोरोनाबाधित, दररोज 30 ते 35 पोलिसांना कोरोना

तीन लाख घेतले, आत्म्याचा प्रभाव काढण्यासाठी त्याने इतरांना खोलीबाहेर काढले, औरंगाबादेत भोंदू हकिमाला बेड्या!

KDCC bank Election 2022 Chairman Election Hasan Mushrif and P N Patil names in race for Kolhapur District Cooperative bank

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.