KDMC Election 2022 Ward 37 | कल्याण डोंबिवलीत सर्वच सत्तेचे दावेदार, कोण मारणार बाजी ?

KDMC Election 2022 Ward 37 | कल्याण डोंबिवलीत सत्ताधारी भाजप आणि शिंदे गट कमाल करतो की , शिवसेना या अग्निदिव्यात खरी उतरते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

KDMC Election 2022 Ward 37 | कल्याण डोंबिवलीत सर्वच सत्तेचे दावेदार, कोण मारणार बाजी ?
कोण राखणार गड? कोण मारणार बाजी?Image Credit source: TV9marathi
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 5:31 PM

KDMC Election 2022 Ward 37 | मुंबई आणि आजुबाजूचा परिसर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पण या बालेकिल्ल्याला गेल्या महिन्यात मोठे भगदाड पडले. तब्बल 40 आमदारांनी आणि आता 10 हून अधिक खासदारांनी या अभेद्य किल्ल्याला सुरुंग लावला आहे. त्याचा परिणाम राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत दिसून येणार आहे. मुंबईनंतर ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली हा शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला होता. पण सत्ताकेंद्रालाच मोठा हादरा बसल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेतील(Kalyan Dombivli MC) निवडणुकीत मोठे फेरबदल पहायला मिळतील. ठाणे परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी पकड आहे. शिवाय या परिसरात शिवसेनेतून बाहेर पडलेली आणि दुखावलेले ही बरेच मोठे नेते आहेत. त्यांना यापूर्वी बळ मिळालेले नव्हते. पण आता त्यांना बळ मिळाले आहे. त्याचा परिणाम दिसून येईल. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली या पालिकेत यापूर्वीच फाटाफुटीचे राजकारण पेटले आहे. मोठ्या प्रमाणात नगरसेवकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. या परिसरात मनसेची ही पकड आहे. तर राष्ट्रवादी ही मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे. डोंबिवली तर भाजपची चांगली पकड आहे. त्यामुळे शिंदे गटाला हाताशी धरुन भाजप (BJP) सत्तेत वाटेकरी होण्यासाठी रान पेटवेल यात शंका नाही.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत उत्तर भारतीयांच्या मतदानाचा टक्का ही मोठा आहे. त्यांचा ही मोठा प्रभाव मतदानावर होईल. मनसेला सोबत घेऊन भाजप आणि शिंदे गटाने युती केल्यास त्याचा राष्ट्रवादीला फायदा होऊ शकतो. तर भाजपला परंपरागत मराठी आणि उत्तर भारतीय मतदार मतदान करेल. परंतु, शिवसेनेचा मतदार संभ्रमात आहे. त्याच्यापुढे आता पर्याय आहेत. हिंदुत्वाच्या मुद्यावर तीन पर्याय समोर आल्याने या मतांचे विभाजन होईल. तर काँग्रेस, राष्ट्रवादी त्याचा फायदा घेऊ शकतात. मराठीच्या मुद्यावर मनसे यावेळी मत मागणार का हा प्रश्न आहेच. तर स्थानिक आघाडीलाही यामध्ये फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकसंख्येचे प्रमाण

2011 मधील जनगणनेनुसार, महापालिका हद्दीत एकूण 15 लाख 18 हजार 762 नगारीक राहतात. आता या लोकसंख्येत मोठा बदल झाला असून त्यात वाढ झाली आहे. प्रभाग 37 मध्ये एकूण 29,088 इतकी लोकसंख्या आहे. त्यापैकी 1,130 लोकसंख्या अनुसूचित जाती आणि 157 लोकसंख्या अनुसूचित जमातीची आहे.

पॅनल पद्धतीच्या प्रभागांचे आरक्षण

यंदाची कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक पॅनल पद्धतीने होत आहे. यामध्ये एकूण 44 प्रभाग असणार आहेत. त्यापैकी 43 प्रभाग त्रिसदस्यीय व एक प्रभाग चार सदस्यांचा असेल. त्यामुळे एकूण 133 सदस्यांच्या सभागृहात 67 जागा महिलांसाठी राखीव आहेत. तर एकूण सदस्य संख्येपैकी अनुसूचित जातींसाठी 13 जागा राखीव असून त्यापैकी अनुसूचित जातींच्या महिलासाठी 7 राखीव आहेत. तसेच अनुसूचित जमाती साठी 4 जागा असून त्यापैकी 2 जागा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव आहेत. सर्वसाधारण गटासाठी (खुल्या) जागा 116 असून त्यापैकी 58 जागा महिलांसाठी राखीव असतील.

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक 2022 प्रभाग 37 आरक्षण

37 अ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

37 ब सर्वसाधारण महिला

37 क अनारक्षित

यापूर्वी प्रभाग 37 मधून विजयी उमेदवार

सचिन खेमा (भाजप)

प्रभाग 37 मधील सध्याचा परिसर कोणता?

या प्रभात संगीतावाडी, शिव मंदिर, सावरकर बगीचा, सुयोग हॉस्पीटल, ट्रॉफिक गार्डन, शिव मंदिर स्मशानभूमी, दत्तनगर, बीएसयुपी, सातघोडा चौक, स्वामी विवेकानंद शाळा, नानासाहेब धर्माधिकारी उद्यान आदी परिसराचा यामध्ये समावेश आहे.

पक्ष उमेदवारविजयी/आघाडी
भारतीय जनता पार्टी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
अपक्ष
पक्ष उमेदवारविजयी/आघाडी
भारतीय जनता पार्टी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
अपक्ष
पक्ष उमेदवारविजयी/आघाडी
भारतीय जनता पार्टी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
अपक्ष
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.