AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KDMC election 2022 Ward 30 : कल्याण डोंबिवलीत वार्ड क्रमांक 30 वर शिवसेनेचं वर्चस्व; आता प्रभागरचनेत कोण बाजी मारणार?

या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाची युती होण्याची शक्यता आहे. तसेच मनसेही भाजपच्या जवळ आली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिंदे गट, मनसे आणि भाजप युती पाहायला मिळाल्यास आश्चर्य नको. त्यामुळे शिवसेनेसाठी ही निवडणूक एक प्रकारचं आव्हान ठरणार आहे.

KDMC election 2022 Ward 30 : कल्याण डोंबिवलीत वार्ड क्रमांक 30 वर शिवसेनेचं वर्चस्व; आता प्रभागरचनेत कोण बाजी मारणार?
| Updated on: Aug 19, 2022 | 10:45 PM
Share

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेची (KDMC) मुदत संपून दोन वर्षे लोटली आहेत. आता यंदा होणाऱ्या केडीएमसीच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. कोरोना संकटामुळे केडीएमसी महापालिकेच्या निवडणुका (KDMC Municipal Election) होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे आता होणाऱ्या केडीएमसीच्या निवडणुकांकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं आहे. केडीएमसीत शिवसेनेची सत्ता होती. मात्र, एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी बंड केल्यानंतर एखाद दोन अपवाद वगळता सर्वच नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे केडीएमसीचं राजकीय गणित आता बदललं आहे. या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाची युती होण्याची शक्यता आहे. तसेच मनसेही भाजपच्या जवळ आली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिंदे गट, मनसे आणि भाजप युती पाहायला मिळाल्यास आश्चर्य नको. त्यामुळे शिवसेनेसाठी ही निवडणूक एक प्रकारचं आव्हान ठरणार आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेतील स्थिती

कल्याण डोंबिवली महापालिकेत एकूण 44 प्रभाग आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्राची एकूण लोकसंख्या 15 लाख 18 हजार 762 इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 1 लाख 50 हजार 171, तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 42 हजार 584 आहे.

प्रभाग क्रमांक 30 चे आरक्षण

कल्याण डोंबविली महापालिकेतील प्रभाग क्रमांक 30 मधील वार्ड 30(अ) मागासवर्ग प्रवर्ग महिला, वार्ड 30 (ब) सर्वसाधारण महिला, तर वार्ड 30 (क) अनारक्षित असेल.

मागील निवडणुकीत काय घडलं होतं?

मागील 2015 च्या निवडणुकीत कल्याण डोंबिवलीतील महानगर पालिकेतील वार्ड क्रमांक 30 मध्ये शिवसेनेचे श्रेयश शामेल हे विजयी झाले होते. 2015 च्या निवडणुकीत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता होती. मात्र या वेळेच्या निवडणुकीत शिवसेनेत पडलेल्या दोन गटामुळे त्याचा महानगरपालिका निवडणुकीवर निश्चितच परिणाम पाहायला मिळेल.

प्रभाग क्रमांक 30 ची लोकसंख्या :

कल्याण डोंबिवली महापालिकेतील प्रभाग क्र. 30 मधील एकूण लोकसंख्या 30 हजार 575 आहे. त्यात अनुसूचित जातीचे मतदार 1 हजार 894, तर अनुसूचित जमातीचे 199 मतदार आहेत.

प्रभाग क्रमांक 30 ची व्याप्ती :

गिरीजा मंदिर, सर्वोदय गंगा, सुमित्रा को. ऑप. हौ. सोसायटी, आरव हाईटस्, अंकित सोसायटी, जन गण मन विद्यामंदिर, एयर पॅलेस सोसायटी, रामचंद्र कृपा अपार्टमेंट, किशोर स्मृती इमारत, निषा हाईटस्.

उत्तर : उल्हासनदी जुनी डोंबिवली व मोठागाव ठाकुर्ली महसूल हद्दीपासून पुढे दिवा वसई रेल्वे लाईन पर्यंत. दिवा वसई रेल्वे लाईन पासून पुढे ओम साई एकविरा चाळ १ व २ वगळुन पुढे गल्लीने बुद्ध विहार, साई प्रवीण स्टोअर्ससह पुढे गल्लीने, लिला निवास पर्यंत. नीला निवाससह, त्रिनाथ इमारत ए व बी वगळुन माजी सैनिक चाळसह, दिपाली, एकविरा जीवन तीर्थ इमारत पर्यंत.

पूर्व : जीवन तीर्थ इमारत पासून पुढे जीवन तीर्थ इमारत सह, ऋषिकेश इमारत वगळून पुढे श्रीराज इमारत सह, पुढे साईराज भवन चाळ, गणराज, उदयराज सोसायटी पर्यंत. पुढे उदयराज सोसायटी सह, रघुनाथ सोसायटी, विश्वेश्वर सोसायटी, विश्वेश्वर दर्शनसह, शिव मल्हार सोसायटी सह पुढे शेवंताधाम वगळुन शांताराम इमारतसह, ऋषिकेश निवाससह, पुढे मगन स्मृती इमारत, जय पारस, नीळकंठ कुटीर इमारती वगळून पुढे पांडुरंग म्हात्रे इमारत सह पुढे राम मंदिर सदगुरु इमारत पर्यंत. सदगुरु इमारत सह पुढे शंकर शेठ रघुनाथ म्हात्रे चौकापर्यंत. पुढे अपेक्षा बंगला सह मयूर, सुशील, श्री मंजुषा सह देवी चौकापर्यंत. देवी चौक पासुन पुढे श्री महेश इमारत वगळुन श्रीनाथ कृपा सह प्रतीक निवाससह, यशवंत टॉवर पर्यंत. पुढे यशवंत टॉवरसह तुळशीराम जोशी बंगला वगळुन ओम शांती भवन इमारतसह, सहाब सदनसह, शाहू सावंत सह, हरिश्चंद्र निवासहस, तुकाराम स्मृती इमारती पर्यंत.

दक्षिण : तुकाराम स्मृतीसह रघुनाथ म्हात्रे इमारत मधुबन निवास, सुंदराबाई आर्केडसह, सुंदराबाई आर्केडच्या बाजूला चाळीसह वरूनधाम वगळुन इंद्रप्रस्थ, ओम समर्थ महेश्वरी इमारती वगळून पुढे शिवनेरी सोसायटी सह, राजस टावर, जय ओम गुरु माऊली सह पुढे जय प्रगती सह, मथुरा, साई वैभवसह, दत्तमाला सह, समर्थ विहारसह पुढे राहूलनगर झोपडपट्टीच्या मोकळ्या जागेच्या भिंतीपर्यंत. भिंतीपासून पुढे सुदामा कुटीर चाळीसह रस्त्यापर्यंत. पुढे शिवशक्ती सदन वगळुन पुढे शाखांबरी व चिदंबरम मंदिरसह पुढे रस्त्याने सुशांत इमारत वगळून पुढे दिवा वसई रेल्वे लाईन च्या शिवा प्लाझा इमारतीच्या मागील बाजुकडील दिवा वसई रेल्वे लाईन पर्यंत.

पश्चिम : शिवा प्लाझा इमारतीच्या मागील बाजूकडील दिवा वसई रेल्वे लाईनने साई लिला बंगल्या सह, जय विला घर वगळुन पुढे उल्हासनदी पर्यंत. उल्हास नदीपासून मोठागाव जुनी डोंबिवली सामाईक हद्दीपर्यंत.

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
पक्षउमेदवारविजयी
काँग्रेस
राष्ट्रवादी
भाजप
शिवसेना
मनसे
इतर
पक्षउमेदवारविजयी
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.