खड्डे भरण्याच्या भ्रष्टाचारात केडीएमसी देशात पहिली; भाजप आमदाराची घाणाघाती टीका

खड्डे भरण्याच्या भ्रष्टाचारात केडीएमसी देशात पहिल्या क्रमांकावर आहे, अशी घाणाघाती टीका भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे.

खड्डे भरण्याच्या भ्रष्टाचारात केडीएमसी देशात पहिली; भाजप आमदाराची घाणाघाती टीका
Follow us
| Updated on: Oct 03, 2020 | 4:31 PM

मुंबई : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत आहेत. पावसाळा संपला तरी खड्डे भरण्याचे काम केले जात नाही. खड्ड्यांमुळे एका दिवसात तीन जण जखमी झाले. यानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनावर घणाघाती टिका केली आहे. (KDMC ranks first in corruption during Potholes repairing says BJP MLA ganpat Gaikwad)

सातत्याने तक्रार करुनही रस्त्यावरील खड्डे भरले गेले नाहीत. खड्डे भरण्यासाठी खडी व मातीचा वापर केला. त्यात डांबराचा पत्ताच नाही. खड्डे भरण्याचे नियम पाळले जात नाहीत. खड्डे आणि रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे अपघात होत आहेत. महापालिकेच्या भ्र्ष्टाचारामुळे नागरिकांचा जीव जात आहे. खड्ड्यांच्या भ्रष्टाचारात कल्याण डोंबिवली महापालिकेचा देशात पहिला नंबर लागतो, अशी टिका आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे.

खड्ड्यांमुळे डोंबिवलीत प्रशांत पोमेणकर, एक महिला व कल्याणमध्ये अवतार सिंग हे जखमी झाले आहेत. इतकेच नाही तर प्रथमेश वाघमारे यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. खड्ड्यांमुळे मागच्या वर्षी काही लोक जखमी झाले होते. दोन वर्षापूर्वी पाच जणांचा मृत्यू झाला होता. तरीदेखील महापालिकेला जाग येत नाही.

शहरातील अनेक रस्त्यांची दूरवस्था झालेली आहे. अनेक रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतूक मंदावते, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते. लोकांचा प्रवासाचा कालावधी वाढतो. त्यामुळे शहरवासीन प्रशासनावर नाराज आहेत.

(KDMC ranks first in corruption during Potholes repairing says BJP MLA ganpat Gaikwad)

संबंधित बातम्या 

कल्याण डोंबिवली नव्हे, ही तर खड्ड्याण डोंबिवली मनपा, मनसेकडून नामकरण, खड्ड्यात केक कापला

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांचा बळी, कल्याण डोंबिवलीतील नगरसेवकाने स्वखर्चातून खड्डे बुजवले

106 व्या वर्षी कोरोनाला धोबीपछाड, डोंबिवलीच्या ‘आनंदी’ आजींचं आदित्य ठाकरेंकडून अभिनंदन

मी स्वत: हून माझे जीवन संपवतोय, डोंबिवलीतील पतपेढीच्या मॅनेजरचा कार्यालयातच गळफास

मुंबईकरांनो मास्क वापरु नका; मरीन ड्राईव्हवर अनोखं आंदोलन

मुंबईत रस्त्यावर-सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांचं प्रमाण घटलं

पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.