पुणे : पुणे तिथे काय उणे…ही म्हणीला अगदी तंतोतंत कृत्यही पुणेकरांनी केलेले आहेत. त्यामुळे याला विशेष महत्वही आहे. इतरांपेक्षा काहीतरी वेगळे हे पुणेकरांचे वैशिष्ट राहिलेले आहे. आता (The President ) राष्ट्रपतींच्या शपथविधीवरुन पुणे चर्चेत आले आहे. भारताच्या नव्या राष्ट्रपती म्हणून (Draupadi Murmu) द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली आहे. त्यामुळे 25 जुलै रोजी (Swearing-in ceremony) शपथग्रहण सोहळा पार पडत आहे. नवनियुक्त नियुक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या अध्यात्मिक आहेत तर त्या शुध्द शाकाहारी देखील असून या सोहळ्यात स्नेहभोजन हे शुद्ध शाकाहारी असावे अशी मागणीच शाकाहाराचे पुरस्कर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली. त्यामुळे या अनोख्या मागणीची खमंग चर्चा आता रंगू लागली आहे. यासंदर्भात गंगवाल यांनी संबंधित विभागांना मेलही केले आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी म्हणजे देशभरातील राजकीय नेते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला राहणार आहे. तर विशेष पाहुणे म्हणून जगभरातून मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान होणाऱ्या स्नेहभोजनात जर शुद्ध शाकाहारी पदार्थाची मेजावानी राहिली तर शाकाहारीचे महत्व सर्वांच्याच लक्षात येणार आहे. भारतीय शाकाहाराची जगभर माहिती होण्यासाठी या कार्यक्रमाचे निमित्त राहणार आहेत. शिवाय भारतीय खाद्य संस्कृतीचेही दर्शन घडेल असा विश्वास शाकाहाराचे पुरस्कर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांना आहे. त्यामुळे त्यांनी पत्रव्यवहार तर केला आहे. त्यावर काय निर्णय होणार हे पहावे लागणार आहे.
भारताच्या नव्या राष्ट्रपती म्हणून काल द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली आहे. आदिवासी समाजातील महिलेची निवड ही सर्वोच्चपदी झाली आहे. द्रौपदी मुर्मू या अध्यात्मिक आहेत. शिवाय त्या मंसाहार करीत नसून शुद्ध शाकाहारी आहेत. त्यामुळे त्यांच्या शपथविधी सोहळ्यात केवळ शाकाहारीच असेच जेवण ठेवावे अशी मागणी डॉ. कल्याण गंगवाल यांनी मेलद्वारे राष्ट्रपती भवन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. त्यांच्या मागणीवर काय निर्णय होणार हे आता पहावे लागणार आहे.
राष्ट्रपतीपदी आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू यांची वर्णी लागली आहे. गुरुवारी निवडीचा निकाल लागला असून आता 25 जुलै रोजी शपथग्रहन सोहळा होत आहे. त्याअनुशंगाने परदेशातील पाहुणे आणि देशभरातून राजकीय नेते हे उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान, सर्व उपस्थितांसाठी शाकाहारच जेवण करण्याची मागणी डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली तर ते एक शाकाहाराचे पुरस्कर्ते आहेत.