‘त्या’ १२ आमदारांचा प्रस्तावच विचाराधीन! संजय राऊत नेमकी भुताटकी कुठे झाली आहे? भाजपचा सवाल

प्रस्तुत प्रकरण विचाराधीन असल्यामुळे सध्य:स्थितीत माहिती उपलब्ध करुन देणे शक्य नसल्याचं उत्तर देण्यात आलंय.

'त्या' १२ आमदारांचा प्रस्तावच विचाराधीन! संजय राऊत नेमकी भुताटकी कुठे झाली आहे? भाजपचा सवाल
शिवसेनेचे खासदार संजय राऊत, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 8:14 PM

मुंबई : विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये गेल्या काही महिन्यांपासून जोरदार राजकारण सुरु आहे. आता या प्रकरणात एका माहिती अधिकारातून एक नवीनच माहिती समोर आली आहे. सोमेश कोलगे यांनी माहिती अधिकाऱ्यातून याबाबत राज्य सरकारला प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यावर प्रस्तुत प्रकरण विचाराधीन असल्यामुळे सध्य:स्थितीत माहिती उपलब्ध करुन देणे शक्य नसल्याचं उत्तर देण्यात आलंय. त्यावरुन आता भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर आणि शिवसेना खासदार संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधलाय. (Keshav Upadhyay criticizes Thackeray government over governor-appointed MLAs)

‘त्या १२ आमदारांचा प्रस्ताव विचाराधीन मुख्यमंत्री कार्यालयाचे माहिती कायदा अतंर्गत उत्तर. प्रश्न होता- प्रस्ताव कधी पाठवला? कोणती नावे पाठविली? काही उत्तर आले का? हा प्रस्तावच विचाराधीन असल्याचे सांगितले आहे. मात्र आता संजय राऊत नेमकी भुताटकी कुठे झाली आहे?’ असा उपरोधिक सवाल उपाध्ये यांनी विचारलाय. त्याचबरोबर ‘कारण हा प्रस्तावच अजून विचाराधीन आहे. सोमेश कोलगे यांनी ही माहिती माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारली होती. आता खुलासा व्हायला हवा. पूर्वी ठरलेली नाव बदलण्याचा प्रस्ताव आहे का? तिन्ही पक्षांचा कोटा बदलतोय का? मुख्यमंत्री मंत्रालयातच जात नसल्याने विचार पूर्ण झाला नाही का?’, असे प्रश्नही उपाध्ये यांनी विचारले आहेत.

वादळात फायली वाहून गेल्या असाव्यात

12 सदस्याचं सदस्यत्व रोखून ठेवणं हा घटनेचा भंग आहे. यात राजकारण असून हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. राजभवनात काही तुफान आलं असावं आणि त्या वादळात फाईल वाहून गेल्या असाव्यात. किंवा तिथे भूतप्रेत आलं असेल म्हणूनच त्या फायली गायब झाल्या, अशी टीका त्यांनी केली. आज 12 सदस्यांची नियुक्ती झाली असती तर आमदार म्हणून त्यांनी कोरोना काळात जोमाने काम केलं असतं, असंही ते म्हणाले होते.

संजय राऊतांची राज्यपालांवरील टीका हा पोरखेळ

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांना फटकारले होते. राऊतांची राज्यपालांविरोधातील टीका म्हणजे निव्वळ पोरखेळ आहे. त्याला काय उत्तर द्यायचं?, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांचा समाचार घेतला होता. संजय राऊत यांना काही कामधंदा नाही. ते दिवसभर काहीबाही बोलत असतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर थोडीच उत्तर द्यायचं असतं, असं सांगत त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.

संबंधित बातम्या : 

राजभवनात भुताटकीचा वावर, एकदा शांतीयज्ञ करून घ्या, शिवसेनेचं टीकास्त्र

‘मातोश्री’ने आमच्यासाठी दरवाजे बंद केले, आम्ही ‘मातोश्री’वर जाणं बंद केलं नाही – देवेंद्र फडणवीस

Keshav Upadhyay criticizes Thackeray government over governor-appointed MLAs

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.