Narayan Rane : किरण पावसकरांनी घेतली नारायण राणेंची भेट, दीपक केसरकरांच्या त्या वक्तव्यानंतर राणे नाराज असल्याच्या चर्चा

नारायण राणे यांच्या गोटातून याबाबत सौम्य प्रतिक्रिया उमटत होत्या, तर नारायण राणे यांच्या जवळचे नेते राजन तेली यांनी याबाबत केसरकारांवर हल्लाबोल चढवला होता, दीपक केसरकर यांना आवर घालावा अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती.

Narayan Rane : किरण पावसकरांनी घेतली नारायण राणेंची भेट, दीपक केसरकरांच्या त्या वक्तव्यानंतर राणे नाराज असल्याच्या चर्चा
दीपक केसरकर, नारायण राणे, आदित्य ठाकरेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 9:05 PM

मुंबई : राज्यात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत असतानाच शिंदे गटाचे (Cm Eknath Shinde) प्रवक्ते किरण पावसकर यांनी आज भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतलेली आहे. काल पत्रकार परिषदेत दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी राणेंबाबत एक मोठा वक्तव्य केलं होतं. नारायण राणे (Narayan Rane) यांनी वारंवार सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव घेऊन बदनामी करण्याचा डाव असल्याचा आरोप केसरकर यांच्याकडून करण्यात आला होता. त्यानंतर नारायण राणे हे नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र नारायण राणे यांच्या गोटातून याबाबत सौम्य प्रतिक्रिया उमटत होत्या, तर नारायण राणे यांच्या जवळचे नेते राजन तेली यांनी याबाबत केसरकारांवर हल्लाबोल चढवला होता, दीपक केसरकर यांना आवर घालावा अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती.

केसरकरांचं वक्तव्यं चुकीचं-पावसकर

तर हिंदुत्वासाठी सर्वकाही माफ आहे, असे म्हणत नितेश राणे यांनी केसरकारांच्या बाबतीत मवाळ भूमिका घेतलेली पाहायला मिळाली. त्यानंतरच पावसकरांनी राणेंच्या घरी दाखल होत राणेंची भेट घेतली आहे. सुशांत सिंह राजपूत याचे प्रकरण अजून न्यायप्रविष्ठ आहे, त्यामध्ये अजून कोणताही निकाल लागलेला नाही. यामध्ये काही महत्त्वपूर्ण निकाल लागू शकतात, त्यामुळे केसरकारांचे हे वक्तव्य चुकीचं होतं, जर उद्या हे वक्तव्य ठाकरे यांच्या विरोधात गेलं तर आमच्याच पक्षाची बदनामी होईल असेही पावसरकर या भेटीनंतर म्हणाले आहेत.

राणेंना वाईट वाटू नये म्हणून भेटलो

केसरकारांनी जे वक्तव्य केले आहे, ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकेल, मात्र नारायण राणे हे आज केंद्रीय मंत्री आहेत, त्यामुळे मी त्यांच्याशी बोललो. आज भाजप आणि शिवसेनेच्या युतीचं सरकार आहे. या सरकारमध्ये कुठेही कोणाच्या मनात काही राहू नये, जर एखादे वक्तव्य चुकीचे गेलं असेल तर त्या व्यक्तीला त्रास होऊ नये, म्हणून त्यांना वाईट वाटू नये यासाठी मी त्यांची मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन भेट घेतलेली आहे, अशी माहिती पावसकर यांनी दिली आहे.

राणेंबाबत बोलणं टाळणार

दरम्यान माझा आणि राणेंचा वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. मात्र तो विषय त्यावेळेसच संपला होता. मी नारायण राणेंची मोदींकडे तक्रार केली अशा बातम्या आल्या त्या चुकीच्या आहेत. सेना आणि भाजपा एकत्र येणार होते याचा मी साक्षीदार आहे. ज्या ज्या वेळी नारायण राणेंना मी भेटलो तेव्हा तेव्हा मी त्यांच्याशी आदराने बोललो आहे, जिल्ह्यातील विकासासाठी माझी नारायण राणेंसोबत काम करण्याची तयारी आहे. मात्र मी जे बोललो ते डायव्हर्ट केलं जातं, त्यामुळे यापुढे मी माझ्या पत्रकार परिषदेत नारायण राणेच्या विषयावर बोलणे टाळणार आहे, अशी प्रतिक्रिया केसरकरांनी दिली आहे.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.