मुंबई : मुंबई महापालिका स्थायी समिती (BMC Standing Committee) अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्यावर भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी गंभीर आरोप केलेत. यशवंत जाधव यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनाही मागे टाकलं. जाधव यांनी 100 कोटींची मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. 100 रुपयांचा शेअर 10 हजार रुपये कोलकाताच्या कंपनीने घेतले, तर 100 कोटींचे शेअर आर्मस्ट्राँग कंपनीच्या खात्यात आले, असं सोमय्या म्हणाले. यशवंत जाधव हे उद्धव ठाकरेंचे शागिर्द आहेत, असं सोमय्या म्हणाले.
सोमय्या पुढे म्हणाले की, 1 रुपया शेअर कोलकात्यातील कंपनीला 500 रुपयाला विकला. या घोटाळ्यात आयएएस अधिकारीही लिप्त आहेत. यात 15 कोटींचा फुलप्रुफ घोटाळा प्रधान डिलर्स प्रा. लि. कंपनीने केलाय. 20 / 10 / 2012 रोजी कंपनी स्थापन झाली आणि 30 / 10 / 2012 रोजी 15 कोटींचा व्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. हे सर्व उदय शंकर महावरच्या मदतीने झालं. उदय शंकर महावर हा गांधी कुटुंबाच्या जवळचा व्यक्ती आहे, असंही सोमय्या यांनी सांगितलं.
#YashwantJadhav ‘s Hawala Operator Uday Shankar Mahawa named by Income Tax in 2014
He gave ENTRIES to National Herald of Congress
यशवंत जाधव यांचे हवाला ऑपरेटर उदय शंकर महावरचे नाव प्राप्तिकर विभागाने २०१४ मध्ये दिले होते
काँग्रेसच्या नॅशनल हेराल्डला त्यानी एन्ट्रीज दिल्या आहे pic.twitter.com/9203HtcrwM
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 5, 2022
2020 मध्ये काही लाखात ही कंपनी जाधव कुटुंबाच्या नावावर झाली. यात 100 कोटी रुपयांचा अपहार झालाय. घाटकोपर, हिंदमाता इथल्या नाले सफाईच्या कॉन्ट्रॅक्टचे पैसे मुख्यमंत्र्यांनी खाल्ले आणि त्यामुळे मुंबई पावसात बुडाली असा गंभीर आरोप करत सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवलाय. यात 500 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग झालं. उद्धव ठाकरे सोनिया गांधींकडे गेले, यामागे उदय शंकर महाराव हे सूत्रधार होते. तीन एजन्सींकडून या अपहाराची चौकशी व्हावी अशी अपेक्षा सोमय्या यांनी व्यक्त केलीय.
सोमय्या यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या बदलीवरुनही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. नील सोमय्या यांना जेलमध्ये टाकलं नाही म्हणून हेमंत नगराळे यांची बदली करण्यात आली, असा दावा सोमय्या यांनी केलाय. आम्हाला मातोश्रीहून माहिती येते. सात दिवसांत कारवाई केली नाही तर पाहा काय होणार, असं हेमंत नगराळे यांना सांगण्यात आलं होतं, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर केलाय.
यशवंत जाधव हे शिवसेनेचे उपनेते आहेत. शिवसैनिक म्हणून त्यांनी शिवसेनेत कामास सुरुवात केली. पुढे शाखाप्रमुख ते स्थायी समिती अध्यक्षपदापर्यंत त्यांनी मजल मारली. 1997मध्ये ते पहिल्यांदा महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मधला काही काळ वगळता ते सातत्याने नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. जाधव यांनी महापालिकेत अनेक महत्त्वाच्या समित्यांवर काम केलं आहे. त्यांची पत्नी यामिनी जाधवही नगरसेविका होत्या. सध्या त्या शिवसेनेच्या आमदार आहेत.
इतर बातम्या :