किरीट सोमय्यांचं नेक्स्ट टार्गेट अर्जुन खोतकर! 100 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप

सोमय्या हे आज औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्याचवेळी अर्जुन खोतकर यांनी 100 कोटीचा घोटाळा केला आहे आणि त्याची तक्रार सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी आणि आयकर विभागाकडे केल्याची माहिती सोमय्या यांनी दिलीय.

किरीट सोमय्यांचं नेक्स्ट टार्गेट अर्जुन खोतकर! 100 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप
किरीट सोमय्या आणि अर्जुन खोतकर.
Follow us
| Updated on: Nov 19, 2021 | 5:52 PM

औरंगाबाद : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांवरील आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे. सोमय्या यांचं नेक्स्ट टार्गेट शिवसेना नेते अर्जुन खोतकर असल्याचं आता स्पष्ट झालंय. सोमय्या हे आज औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्याचवेळी अर्जुन खोतकर यांनी 100 कोटीचा घोटाळा केला आहे आणि त्याची तक्रार सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी आणि आयकर विभागाकडे केल्याची माहिती सोमय्या यांनी दिलीय. (Kirit Somaiya accuses Shiv Sena leader Arjun Khotkar of Rs 100 crore scam)

शरद पवार म्हणाले अनिल देशमुख यांच्या प्रत्येक क्षणाची शिक्षा दिली जाईल. पण त्यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनीच जेलमध्ये टाकलं. ही धमकी कुणाला देता, धमक्यांची सिरीज सुरु करा. 23 जणांची चौकशी सुरु आहे. त्यात अनिल परब, हसन मुश्रीफ, भावना गवळीही आहेत. आज मी अर्जुन खोतकर यांचं नाव घेत आहे. अर्जुन खोतकर यांनी 100 कोटींचा घोटाळा केला. त्याची तक्रार आयकर विभाग आणि ईडीकडे तक्रार केलीय. अर्जुन खोतकर यांनी रामनगर कारखाना बेनामी पद्धतीने फसवून घेतला आहे. मुळे आणि तापडियाकडे ज्या धाडी पडल्या त्या खोतकर यांच्याशी संबंधितच होत्या, असा दावा सोमय्या यांनी केलाय.

‘पवार, ठाकरेंचे सहकारीच असे घोटाळे करु शकतात’

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे सहकारीच असे घोटाळे करु शकतात. मुळे, तापडिया आणि खोतकरांनी मिलिभगत करुन हा कारखान्याचा घोटाळा केलाय. कारखान्याची 100 एकर जमीन हडप करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्या जमिनीवर कॉम्प्लेक्स बांधण्याचा प्रयत्न सुरु आहे. अर्जुन खोतकर यांची 100 कोटीचा कारखाना आणि 1 हजार कोटींच्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या घोटाळ्याची चौकशी सुरु झाली असल्याचं सोमय्या म्हणाले. तसंच शरद पवार यांचा ईडी अधिकारी, आयकर विभागाचे अधिकारी, हायकोर्ट आणि भाजपला धमकी देण्याचा उद्देश होता, असा आरोपही सोमय्या यांनी केलाय.

‘शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही’

माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुख यांचं कौतुक करताना त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचं स्पष्ट केलंय. तर शरद पवारांच्या आशीर्वादानं अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा गृहमंत्रीपदावर बसवायचं असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हणाले. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलीय.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा धमक्यांना आम्ही घाबरत नाही. धमकी कोणाला? सुप्रीम कोर्टला, हायकोर्टला, ईडीला, भाजपाला की किरीट सोमैयांना ? फक्त अनिल देशमुख नाही, जितेंद्र आव्हाडांची पण अटक झाली, आनंद अडसूळ यांची पण अटक झाली. महाराष्ट्राची जनता घोटाळेबाजांना सजा देणारच. घोटाळेबाजांवर कारवाई होणारच!, असं ट्विट करुन किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला एकप्रकारे इशाराच दिलाय.

इतर बातम्या : 

Farm Laws : पंतप्रधान मोदींनी त्या 700 शेतकरी कुटुंबीयांची माफी मागावी- संजय राऊत

आंदोलन नेतृत्वहीन, चर्चा नेमकी कुणाशी करायची? अनिल परबांचा सवाल; खासगीकरणाचा प्रस्ताव नसल्याचंही स्पष्ट

Kirit Somaiya accuses Shiv Sena leader Arjun Khotkar of Rs 100 crore scam

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.