Kirit Somaiya निल सोमय्या यांच्यावरती गुन्हा दाखल, नागरिकांकडून मोठा आर्थिक निधी जमा केल्याचा आरोप

भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचा मुलगा निल सोमय्या (Neil Somaiya) यांच्यावरती मंगळवारी रात्री उशिरा मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस (Trombay Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kirit Somaiya निल सोमय्या यांच्यावरती गुन्हा दाखल, नागरिकांकडून मोठा आर्थिक निधी जमा केल्याचा आरोप
नागरिकांकडून मोठा आर्थिक निधी जमा केल्याचा आरोपImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 10:47 AM

मुंबई – भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचा मुलगा निल सोमय्या (Neil Somaiya) यांच्यावरती मंगळवारी रात्री उशिरा मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस (Trombay Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयएनएस विक्रांत या लढाऊ जहाजाच्या दुरुस्तीसाठी बाप-लेकानी 2013-14 मध्ये एक अभियान चालवलं होतं. त्यावेळी पिता-पुत्रांनी नागरिकांकडून मोठा आर्थिक निधी जमा केला होता. बाप-लेकांनी जमा झालेला निधी राज्यपाल यांच्या सचिवाकडे जमा करणे आवश्यक होते. परंतु तो निधी राज्यपाल सचिवांकडे जमा न करता त्यांनी अपहार केला असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ही तक्रार एका माजी सैनिकांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात केली आहे. तक्रारीवरून ट्रॉम्बे पोलीसांनी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा निल सोमय्या यांच्यावरती कलम 420, 406, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर किरीट सोमय्या आज प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.

भ्रष्टाचाराविरोधात महाराष्ट्रभर आज आंदोलन करू – संजय राऊत

किरीट सोमय्या खूप मोठा घोटाळा केला आहे. त्यांनी आयएनएस विक्रांत या जहाजाच्या दुरूस्तीसाठी 700 बॉक्समध्ये पैसा जमा केला. जमा झालेला पैसा किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी निवडणुकीत वापरला आहे. हे खूप मोठ प्रकरण आहे. काही पैसे त्यांनी पीएमसी बॅंकेच्या माध्यमातून चलनात आणले. किरीट सोमय्यांनी त्यातील काही पैसे त्यांच्या मुलुंडच्या कार्यालयात ठेवले होते. किरीट सोमय्यांनी खूप मोठा घोटाळा केला असल्याने आम्ही आज राज्यभर आंदोलन करू असं संजय राऊत म्हणाले.

राजकीय वातावरण तापणार

राज्यात महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना केंद्रीय यंत्रणा टार्गेट करत असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच ईडीने आणि आयकर विभागाने महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ही सगळी प्रकरण किरीट सोमय्यांनी बाहेर काढली आहेत. महाविकास आघाडी हे भ्रष्टाचारी सरकार असल्याची टीका किरीट सोमय्यांनी अनेकदा केली आहे. काल रात्री किरीट सोमय्या यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्याने ते आज काय भूमिका मांडतात पाहावे लागेल.

Nashik Public Healthcare: नाशिक जिल्हा रुग्णालयात 3 महिला बोगस डॉक्टर आढळल्याने खळबळ

Rape on Animal | घृणास्पद! कोल्हापुरात घोरपडीवर बलात्कार, कोकणातून तरुण ताब्यात

Kiran Mane: ‘अख्खी सिरीयलच प्राईम टाईममधून लाथ घालून हाकलली’; ‘मुलगी झाली हो’ मालिकेविषयी किरण मानेंची पोस्ट चर्चेत

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.