किरीट सोमय्यांची उमेदवारी अडचणीत
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका करणे भाजप खासदार किरीट सोमय्या यांना भोवण्याची शक्यता आहे. कारण ईशान्य मुंबईत विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांची उमेदवारी अडचणीत आली आहे. किरीट सोमय्यांसह आणखी एका नावाची शिफारस करण्याची सूचना केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना केली आहे. त्यामुळे सोमय्या यांच्या उमेदवारीसंदर्भातील अडचणी वाढल्या असल्याची चर्चा आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत किरीट […]
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका करणे भाजप खासदार किरीट सोमय्या यांना भोवण्याची शक्यता आहे. कारण ईशान्य मुंबईत विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांची उमेदवारी अडचणीत आली आहे. किरीट सोमय्यांसह आणखी एका नावाची शिफारस करण्याची सूचना केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना केली आहे. त्यामुळे सोमय्या यांच्या उमेदवारीसंदर्भातील अडचणी वाढल्या असल्याची चर्चा आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत किरीट सोमय्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टोकाची टीका केली होती. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये किरीट सोमय्यांबद्दल राग आहे.
काही दिवसांपूर्वीच शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांना पाडणारच असा निर्धार केला होता. त्यावेळी युती झाली नव्हती. शिवसैनिकांनी थेट भाजप खासदार किरीट सोमय्या यांना विरोध केला. युतीचा उमेदवार जर किरीट सोमय्या असतील तर त्यांना पाडू असा थेट इशारा शिवसेना विभागप्रमुखांनी दिला होता.
मुंबईत सहापैकी शिवसेनेचे तीन विद्यमान खासदार आहेत. तर इतर तीन ठिकाणी भाजपचे खासदार आहेत. विधानसभा निवडणुकीवेळी युती तुटल्यानंतर शिवसेनेवर सर्वाधिक टीका करुन, युतीत दरी निर्माण करणारे भाजप खासदार किरीट सोमय्यांवर शिवसैनिक आजही भयंकर संतप्त आहेत.
मुंबई महापालिका निवडणूक प्रचारात तर मुलुंडमध्ये किरीट सोमय्यांच्या अंगावरही शिवसैनिक धावून गेले होते. त्यामुळे दोन्ही पक्षातील वितुष्ट पाहता, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसैनिकांनी आक्रमकपणा कायम ठेवला आहे. जर किरीट सोमय्या हें शिवसेना- भाजप युतीचे असतील, तर शिवसेना किरीट सोमय्यांना पाडणार, असा पण शिवसैनिकांनी केल्याचं शिवसेना विभागप्रमुखांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचं चित्र
ईशान्य मुंबईमध्ये सलग दोनवेळा कोणीही निवडून आलं नसून प्रमोद महाजनांसारख्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. ईशान्य मुंबईचा भाग मिश्र मतदारांचा असून मराठी, गुजराती, दलित, उत्तर भारतीयांसारखे सर्व मतदार यात आहेत. हे समीकरण ज्या पक्षाला जास्त चांगलं जमवता येईल त्याचा विजय निश्चित आहे. गेल्यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आपकडून ही निवडणूक लढवली होती पण मोदी लाटेसमोर त्यांचा टिकाव लागला नाही. पण आता समीकरणं बदलली असून भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी कायम शिवसेना नेतृत्वाला टीकेचं लक्ष केल्याने निवडणुकीच्या माध्यमातून ती खदखद बाहेर येण्याची शक्यता आहे.
मुलुंडपासून मानखुर्दपर्यंत हा मतदारसंघ पसरलेला असून 2009 च्या निवडणुकीत सोमय्या यांचा फक्त 2 हजार 399 मतांनी पराभव झाला होता. पण 2014 च्या निवडणुकीत त्यांनी तब्बल 5 लाख 25 हजार 285 मते मिळवून राष्ट्रवादीचे संजय पाटील यांच्यावर मात केली. ईशान्य मुंबईतल्या एकूण सहा आमदारांपैकी तीन आमदार भाजपचे आहेत, तर शिवसेनेचे दोन आणि समाजवादी पक्षाचा एक आमदार आहे.
संबंधित बातम्या
न्यूजरूम स्ट्राईक: भाजप खासदार किरीट सोमय्या यांची मुलाखत
राष्ट्रवादीचा दुसरा उमेदवार, संजय दिना पाटलांना उमेदवारी
ईशान्य मुंबई लोकसभा : किरीट सोमय्यांना यंदा शिवसेनेचंच आव्हान
शिवसैनिकांचा निर्धार, किरीट सोमय्यांना पाडणारच!
महाआघाडीकडून मनसेचे महेश मांजरेकर विरुद्ध किरीट सोमय्यांची लढत?