अनिल परबांचं टेन्शन वाढलं? कदमांसह खरमाटेंकडेही मोठं घबाड! Income Tax च्या हवाल्यानं सोमय्यांचा दावा
आयकर विभागाच्या धाडीत धाडीत मोठं घबाड सापडल्याचा दावा भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केलाय. आयकर विभागाच्या धाडीतून अनिल परब, सदानंद कदम, बजरंग खरमाटे हे कोट्यवधींची रोकड, अपारदर्शक व्यावाकार आणि मनी लॉन्ड्रिंग मध्ये सहभागी असल्याचं आढळल्याचं सोमय्यांनी म्हटलंय. तसंच ईडीनेही कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केलीय.
मुंबई : शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचा पाय अजून खोलात जात असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण 8 मार्च रोजी आटकर विभागाने (Income Tax Department) मुंबईसह एकूण 26 ठिकाणी टाकलेल्या धाडी या मंत्री अनिल परब आणि त्यांच्याशी संबंधित सरकारी अधिकारी बजरंग खरमाटे (Bajrang Kharmate), संजय कदम यांच्याशी संबंधित आहेत. तसंच या धाडीत मोठं घबाड सापडल्याचा दावा भाजप खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलाय. आयकर विभागाच्या धाडीतून अनिल परब, सदानंद कदम, बजरंग खरमाटे हे कोट्यवधींची रोकड, अपारदर्शक व्यावाकार आणि मनी लॉन्ड्रिंग मध्ये सहभागी असल्याचं आढळल्याचं सोमय्यांनी म्हटलंय. तसंच ईडीनेही कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केलीय.
आयकर विभागाच्या प्रेसनोटमध्ये काय?
राज्य सरकारी अधिकाऱ्याच्या प्रकरणात चौकशीदरम्यान त्यांनी, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि नातेवाईकांनी मागील दहा वर्षाच्या काळात पुणे, सांगली आणि बारामती येथील प्राइम लोकेशनमध्ये मालमत्तांच्या स्वरूपात प्रचंड संपत्ती खरेदी केल्याचं उघड झालं. त्यांच्या कुटुंबाकडे पुण्यात एक बंगला आणि एक फार्म हाऊस, तासगावमध्ये एक भव्य फार्म हाऊस, सांगलीत दोन बंगले, तनिष्क आणि कॅरट या नामांकित ब्रँडची शोरूम आहेत. तसंच पुण्यातील विविध ठिकाणी पाच फ्लॅट, नवी मुंबईत एक फ्लॅट, मोकळे भूखंड, सांगली, बारामती, पुणे आणि गेल्या सात वर्षांत 100 एकरहून अधिक शेतजमीन खरेदी केलीय. मालमत्तेच्या संपादनाचे स्त्रोत आणि दुकाने आणि बंगल्यांच्या भव्य आतील भागांवर खर्च केलेल्या रकमेची तपशीलवार चौकशी सुरु आहे. या कुटुंबाकडे इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचे शोरूम, तनिष्क शोरूमसह अनेक व्यवसाय आहेत, असं आयकर विभागाच्या प्रेस नोटमध्ये सांगण्यात आलंय.
इतकच नाही तर या सरकारी कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांकडून चालवल्या जाणाऱ्या बांधकाम व्यवसायाला राज्य सरकारकडून अनेक कंत्राटे देण्यात आली. तसंच बोगस खरेदी आणि बोगस उप-करारांच्या माध्यमातून कराराच्या खर्चात वाढ झाल्याचा पुरावाही चौकशीतून मिळाला. तसंच बनावट कंत्राटांच्या माध्यमातून 27 करोड रुपये मिळविल्याची बिले आयटीला मिळाली. बारामती परिसरातील जमिनीची 2 करोड रुपयांच्या पावत्या आयटीने मिळवल्या आहेत. बांधकाम व्यवसायातील करचुकवेगिरीबाबत पुढील तपास सुरू असल्याचंही सांगण्यात आलंय.
किरीट सोमय्यांचा दावा काय?
आयकर विभागाच्या धाडींचे परिणाम: अनिल परब, सदानंद कदम, बजरंग खारमाटे हे कोट्यावधींची रोकड, अपारदर्शक व्यावाकार, व money laundering मध्ये सहभागी असल्याचे आढळले
आयकर विभागाची प्रेसनोट (सल्लग्न)
ED ने सुद्धा कारवाई करावी अशी विनंती
भारत सरकारने सुद्धा फौजदारी खटला दाखल केला आहे pic.twitter.com/hybhf5cf3B
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 17, 2022
खरमाटेंवर यापूर्वीही आरोप
बजरंग खरमाटे हे नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन विभागामधील उप परिवहन अधिकारी होते. सध्या ते पुण्यातील आरटीओ कार्यालयात कार्यरत असल्याचं समजतं. ते परिवहन मंत्री अनिल परब यांचे जवळचे मानले जातात. अनिल परब आणि बजरंग खरमाटे यांनी संगनमताने करोडो रुपये जमवले आणि आपसात वाटून घेतले, असा आरोप भाजप नेते किरिट सोमैय्या यांनी केला होता. त्यांनी दोन-दोन महिन्यांनी अनेक अधिकाऱ्यांची बदली केली आणि 25-30 लाख रुपयांपासून एक कोटी रुपये घेऊन प्रमोशन केले असल्याचेही सोमैय्या यांनी आपल्या आरोपात म्हटले होते.
इतर बातम्या :