Anil Parab : माझ्या तक्रारीच्या आधारावरती धाडी टाकल्या जात आहेत, किरीट सोमय्यांची अनिल परब यांच्यावरती जोरदार टीका

किरीट सोमय्यांनी अनिल परब यांच्यावरती जोरदार टीका केली. "सात कोटी रुपये व्हाईटचे वापरले, 25 कोटी ब्लॅक आणि सात कोटी व्हाईट, हे अनिल परबांनी दाखवलेले नाहीत" त्यामुळे अनिल परब यांच्यावरती कारवाई होत आहे.

Anil Parab : माझ्या तक्रारीच्या आधारावरती धाडी टाकल्या जात आहेत, किरीट सोमय्यांची अनिल परब यांच्यावरती जोरदार टीका
माझ्या तक्रारीच्या आधारावरती धाडी टाकल्या जात आहेतImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 2:11 PM

मुंबई – अनिल परब (Anil Parab) यांच्या संबंधित मालमत्तांवरती सकाळपासून सात ठिकाणी ईडीची (ED) छापेमारी सुरू झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातलं राजकारण तापलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपकडून (BJP) सुडबुद्धीने राजकारण सुरू असल्याची टीका केली जात आहे. तसेच विरोधकांकडून योग्य कारवाई केल्याचं म्हटलं जात आहे. कारवाई संपल्यानंतर अनिल परब यांच्यावरती कोणती कारवाई होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. “परबांनी बांधलेला रिसॉर्ट पाडण्याचे आदेश ठाकरे सरकारनं दिला आहे. चार दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं सांगितलं की, अनिल परबांना जी मुदत दिलेली होती, ती 2 मे 2022 ला संपली आहे. आता रिसॉर्टचं वीजपाणी बंद केलं पाहिजे. ज्या धाडी टाकल्या जात आहेत, त्या माझ्या तक्रारींच्या आधारे टाकल्याचं दिसतंय असं किरीट सोमय्यांनी मीडियाला सांगितलं.

रिसॉर्ट संबंधी आर्थिकबाबा अनिल परब पाहतात

किरीट सोमय्यांनी अनिल परब यांच्यावरती जोरदार टीका केली. “सात कोटी रुपये व्हाईटचे वापरले, 25 कोटी ब्लॅक आणि सात कोटी व्हाईट, हे अनिल परबांनी दाखवलेले नाहीत” त्यामुळे अनिल परब यांच्यावरती कारवाई होत आहे. तसेच सदानंद कदम आणि अनिल कदमांच्या सीएनेच याबाबत माहिती दिली आहे. संबंधित दापोलीतील फार्म हाऊसचे इलेक्ट्रीक मीटर अनिल परबांच्या नावे आहे, बिलही तेच भरत आहेत. प्रॉपर्टी टॅक्सही तेच भरत आहेत. 25 कोटीची प्रॉपर्टी आहे असं ते सांगतात, पण त्यांनी याची माहिती कुठे दिलेली नाही असाही टोला किरीट सोमय्यांनी अनिल परबांना लगावला.

अनिल परबांचा रिसॉर्ट पुढे बेनामी असल्याचं घोषित होईल

अनिल परबांचा रिसॉर्ट पुढे बेनामी असल्याचं घोषित केलं जाणार आहे. काळ्या पैशाची चौकशी इनकम टॅक्सने केली पाहिजे. अनिल परबांनी खोट्या पद्धतीनं कागदपत्र मिळवले आहे. वेगवेगळे गुन्हे अनिल परबांनी आत्तापर्यंत केलेले आहेत. त्यांना अटक व्हायलाच हवी, अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे. अनिल देखमुख, नवाब मलिक आणि आत्ता अनिल परबवरती कारवाई सुरू झाली आहे.

हे सुद्धा वाचा

त्यामुळे त्यांनी आपला बोजा बिस्तरा गुंडाळावा असं देखील म्हटलं आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.