‘साडे तीन लोकांना अटक करा किंवा साडे तिनशे, पण आधी आरोपांची उत्तरं द्या’, किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरे, राऊतांना खोचक टोला

भाजपचे साडेतीन लोक देशमुखांच्या जागी कोठडीत जाणार आणि देशमुख बाहेर येणार असा थेट इशाराच राऊतांनी दिला आहे. राऊतांच्या या इशाऱ्याबाबत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना विचारलं असता, भाजपच्या साडे तीन लोकांना अटक किंवा साडे तिनशे, पण आधी आरोपांची उत्तरं द्या, असा जोरदार टोला सोमय्या यांनी लगावला आहे.

'साडे तीन लोकांना अटक करा किंवा साडे तिनशे, पण आधी आरोपांची उत्तरं द्या', किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरे, राऊतांना खोचक टोला
किरीट सोमय्या, उद्धव ठाकरे, संजय राऊत
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 6:47 PM

पुणे : भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, खालच्या भाषेत टीका आणि तुरुंगात पाठवण्याची भाषा वापरली जात आहे. अशातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्या शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर भाजपचे साडेतीन लोक देशमुखांच्या जागी कोठडीत जाणार आणि देशमुख बाहेर येणार असा थेट इशाराच राऊतांनी दिला आहे. राऊतांच्या या इशाऱ्याबाबत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना विचारलं असता, भाजपच्या साडे तीन लोकांना अटक किंवा साडे तीनशे, पण आधी आरोपांची उत्तरं द्या, असा जोरदार टोला सोमय्या यांनी लगावला आहे.

‘कुणीतरी सकाळी उठून पाच पाणी पत्र लिहिणार की ईडीने त्या डेकोरेटला बोलावलं होतं. ज्याने माझ्या मुलीच्या लग्नाचं काम केलं त्याच्या डोक्यावर बंदूक ठेवली. तर ज्याच्या डोक्यावर बंदूक ठेवली त्याला त्यांनी प्रस्तुत केलं पाहिजे. त्याने ताबडतोब पोलीस ठाण्यात तक्रार केली पाहिजे. पत्र जाहीर करुन पाच दिवस झाले की प्रकरण संपलं? म्हणून तो विषय डायव्हर्ट करण्यासाठी की कोविड घोटाळा इतका मोठा झालेला आहे, त्यात सगळे फसले आहेत, अडकले आहेत, जनतेला उत्तर देऊ शकत नाहीत. म्हणून साडे तीन लोक, दिड लोक आणि एक लोक… अरे बाबा मी घोटाळा केला आहे, काही गुन्हा केला आहे तर कर ना माझ्यावर कारवाई. वाट कसली पाहताय? साडे तीन लोकांना अटक करण्यासाठी उद्धव ठाकरे काय मुहूर्त शोधत होते काय?’ असा सवाल किरीट सोमय्या यांनी केलाय.

‘आधी उत्तर द्या, मग साडे तीन काय साडे तीनशे लोकांना अटक करा’

‘मला विषय डायव्हर्ट करायचा नाही. कोविड काळात ज्या पद्धतीने माफिया सेनेनं कमाई आणि लोकांच्या जीवाशी खेळ केलाय. त्याला जनता माफ करणार नाही आणि मी सोडणार नाही. माझ्या प्रश्नाची उत्तरं अजून दिली नाहीत राऊतांनी किंवा उद्धव ठाकरे साहेबांनी. ती जी कोविड कंपनी लाईफलाईन हेल्थ केअर, त्याला तुम्ही परवानगी दिली, मी नाही दिली. त्याला ब्लॅकलिस्ट उद्धव ठाकरेंनी केलं, मी नाही केलं. कंत्राटपण मुंबई महापालिका अर्थात उद्धव ठाकरेंनी दिलं. 15 दिवसानंतर ही कंपनी बदमाश आहे, त्यांच्याकडे काही नाही, त्यांनी फोर्जरी केली… तुम्हाला मी दिलेलं आहे त्यात सविस्तर अहवाल आहे. म्हणजे तुम्ही पैशासाठी हजारो कोविड रुग्णांच्या जीवाशी खेळलात. याचं उत्तर ते देत नाहीत. ब्लॅकलिस्ट केल्यानंतर त्यांना कंत्राट मिळालं कसं? आणि ब्लॅकलिस्ट 15 दिवसांत झाली त्याला तुम्ही कंत्राट दिलं कसं? मी पुणे महापालिका, पीएमआरडीए, मुंबई महापालिका सगळ्या ठिकाणी जाऊन आलो. माहिती अधिकाराखाली सगळी कागदपत्र माझ्याकडे आहेत. या कंपनीचा अर्जच नाही. ही कंपनी पार्टनरशिप अॅक्टमध्ये रजिस्टरच केलेली नाही. मग जी कंपनी अस्तित्वात नाही. ज्या कंपनीनं रजिस्ट्रेशन केलं नाही. ज्या कंपनीकडे अशाप्रकारची सिस्टिम नाही, त्या कंपनीला तुम्ही कोविड सेंटरचं कंत्राट कसं दिलं? याचं उत्तर उद्धव ठाकरेंना द्यावच लागेल. मग भाजपच्या साडे तीन लोकांना अटक करा किंवा साडे तीनशे’, अशा शब्दात सोमय्या यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना थेट प्रत्युत्तर दिलंय.

आदित्य ठाकरे नाटकं बंद करा, सोमय्यांचा घणाघात

आदित्य ठाकरेंना सांगा नाटकं बंद करा. उद्धव ठाकरे यांनी यांनी कंत्राट दिलं आहे. त्याचं उत्तर आदित्य ठाकरे का देत नाहीत. ब्लॅकलिस्ट त्यांनी केली ना. मग आदित्य ठाकरेंच्या वरळीचं कंत्राट त्यांना मिळालं कसं? म्हणून ही सगळी शेरो-शायरी आहे ना ती लोकांच्या जीवाशी खेळण्यासाठी नाही. का आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे कारवाई करत नाहीत? असा सवालही सोमय्या यांनी केलाय.

इतर बातम्या :

शिवसेना खासदार राजेंद्र गावितांना 1 वर्षाचा तुरुंगवास आणि पावणे दोन कोटीचा दंड! नेमकं प्रकरण काय?

कितीही वाचवण्याचा प्रयत्न करा, अनिल परबांना तुरुंगात जावंच लागेल; किरीट सोमय्या

माझी पत्रकार परिषद खुद्द मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, संजय राऊत उद्या काय “बॉम्ब” फोडणार?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.