‘ही कमाल फक्त उद्धव ठाकरेच करु शकतात!’ जमीन खरेदी प्रकरणात सोमय्यांचा पुन्हा मुख्यमंत्र्यांना टोला

रश्मी उद्धव ठाकरे यांनी कर्जतमध्ये 8 एकर जमीन घेतली. भाऊ पाटणकर यांच्याकडून बहीण रश्मी ठाकरे यांनी जमीन विकत घेताना मध्ये बोगस बेनामी नावं का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला आहे.

'ही कमाल फक्त उद्धव ठाकरेच करु शकतात!' जमीन खरेदी प्रकरणात सोमय्यांचा पुन्हा मुख्यमंत्र्यांना टोला
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 6:34 PM

रायगड : कर्जतमधील कथित जमीन खरेदी प्रकरणावरुन भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सोमय्या यांनी आज कर्जत तहसीलदारांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात कर्जतमधील जमिनीची अपूर्ण माहिती दिल्याचा आरोप सोमय्या यांचा आहे. त्या प्रकरणातच सोमय्या आज कर्जत तहसीलदार यांना भेटले.(Kirit Somaiya criticizes CM Uddhav Thackeray over Karjat land purchase case)

रश्मी उद्धव ठाकरे यांनी कर्जतमध्ये 8 एकर जमीन घेतली. भाऊ पाटणकर यांच्याकडून बहीण रश्मी ठाकरे यांनी जमीन विकत घेताना मध्ये बोगस बेनामी नावं का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला आहे. बहिणीने भावाकडून जमीन घेताना दोन बोगस बेनामी नावं उभी केली. ही कमाल उद्धव ठाकरेच करु शकतात. उद्धव साहेब जबाव दो, असं आव्हानच सोमय्या यांनी केलंय. कर्जत तहसील कार्यालयात माहितीच्या अधिकारात चौकशी करण्यासाठी सोमय्या यांनी कर्जत तहसीलदारांची भेट घेतली.

दरम्यान, सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांची एका जुन्या वादातून पोलिस चौकशी झाली आहे. त्यानंतर आता किरीट सोमय्या चांगलेच आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात कर्जतमधील जमिनीची अपूर्ण माहिती दिल्याचा आरोप सोमय्या यांचा आहे. त्या प्रकरणात आता आपण कर्जत तहसीलदाराची भेट घेणार असल्याची माहिती सोमय्या यांनी रविवारी दिली होती. त्यानुसार सोमय्या आज कर्जतमध्ये होते.

सोमय्या यांच्या मुलाची चौकशी

सोमय्या यांचे पूत्र नील सोमय्या यांची एका जुन्या वादातून पोलिस चौकशी करण्यात आली आहे. मुलुंडच्या पोलिस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार नील सोमय्या यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पार पडली. नील सोमय्या हे भाजपचे नगरसेवक आहेत. सध्या ज्या प्रकरणात नील सोमय्या यांची चौकशी झाली, ते प्रकरण बरंच जुनं आहे. मात्र, काल पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली. या चौकशीनंतर नील सोमय्या घरी परतले. आता पुढील काळात पोलिस नील सोमय्या यांच्यावर काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागलं आहे.

जमीन प्रकरणात सोमय्यांचे ठाकरेंवरील आरोप काय?

किरिट सोमय्या यांनी कथित जमीन खरेदी प्रकरणावरून नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोपांची मालिका सुरु केली आहे. ठाकरे कुटुंबांनी आतापर्यंत जमिनीचे 40 व्यवहार केले आहेत. त्यापैकी 30 व्यवहार एकट्या अन्वय नाईक यांच्याशी केले आहेत. नाईक यांच्यासोबत एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार करण्याचे कारण काय? मुख्यमंत्र्यांचा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे का?, अशी प्रश्नांची सरबत्तीच किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर केली होती.

ठाकरे कुटुंब आणि अन्वय नाईक यांचे संबंध काय आहेत?, ठाकरे कुटुंब आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांचे आर्थिक संबंध काय आहेत? असे सवाल सोमय्या यांनी केले. ठाकरे परिवाराने एकूण 40 जमिनींचे व्यवहार केले आहेत. त्यापैकी 30 जमिनींचे व्यवहार एकट्या अन्वय नाईकसोबत झाले आहेत. एका व्यक्तीशी जमिनीचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार कसे काय झाले? असा सवाल सोमय्या यांनी केला. मी ठाकरे कुटुंबाला केवळ पाच प्रश्न विचारले आहेत. त्याची त्यांनी उत्तरं द्यावीत. महाराष्ट्रातील जनतेला या व्यवहारांची माहिती हवी आहे, असं आव्हान सोमय्या यांनी केलं होतं.

संबंधित बातम्या :

थातूरमातूर बोलू नका, सोमय्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या; राम कदम यांचं राऊतांना आव्हान

किरीट सोमय्यांनी पुन्हा वात पेटवली; ठाकरे सरकारच्या कथित तीन घोटाळ्यांची कागदपत्रे जाहीर

Kirit Somaiya criticizes CM Uddhav Thackeray over Karjat land purchase case

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.