Kirit Somaiya Vs Uddhav Thackeray: मला च XXX, भ XXX, बोबड्या, टमरेल काही म्हणा पण… किरीट सोमय्यांनी केले उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढवणारे स्टेटमेंट
माननीय उद्धव ठाकरे साहेब, आपण मला तोतला म्हणा, बोबड्या म्हणा, XXX म्हणा, काय पाहिजे ते म्हणा पण 19 बंगल्यांचा घोटाळ्याचा हिशोब तर द्यावाच लागणार. आपले सुपुत्र आदित्य ठाकरें यांनी नंदकिशोर चतुर्वेदी कडून कोट्यवधी रुपयेच मनी लॉंडरींग केलं आहे. आपला मेव्हणा श्रीधर पाटणकरचे कोट्यवधी रुपयांचे डझनभर फ्लॅट जप्त झाले आहेत. यचा हिशोब तर द्यावाच लागणार असे सोमय्या म्हणाले.
मुंबई : एकनाथ शिंदेच्या(Eknath Shinde) बंडखोरीमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. शिंदेचे बंड मोडून काढण्यासाठी शिवसेनेने सर्व शक्ती पणाला लावली आहे. अशातच भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांनी जुने घोटाळ्याचे आरोप उकरुन काढत उद्धव ठाकरेंचे(CM Uddhav Thackeray) टेन्शन वाढवणारे स्टेटमेंट केले आहे. घोटाळ्यांचा हिशेब उद्धव ठाकरेंना द्यावाच लागणार असे किरीट सोमय्या यांनी म्हंटले आहे. यामुळे घोटाळ्यांचे आरोप प्रत्यारोप पुन्हा सुरु होणार आहेत.
माननीय उद्धव ठाकरे साहेब, आपण मला तोतला म्हणा, बोबड्या म्हणा, XXX म्हणा, काय पाहिजे ते म्हणा पण 19 बंगल्यांचा घोटाळ्याचा हिशोब तर द्यावाच लागणार. आपले सुपुत्र आदित्य ठाकरें यांनी नंदकिशोर चतुर्वेदी कडून कोट्यवधी रुपयेच मनी लॉंडरींग केलं आहे. आपला मेव्हणा श्रीधर पाटणकरचे कोट्यवधी रुपयांचे डझनभर फ्लॅट जप्त झाले आहेत. यचा हिशोब तर द्यावाच लागणार असे सोमय्या म्हणाले.
महाराष्ट्रात माफिया राजचा अंत जवळ आला आहे. मुंबई महापालिकेचं माफिया राज पण मुंबईकर संपवणार आहेत. घाटकोपर येथे आयोजित डॉ. किरीट सोमैया “कार्यकर्ता संवाद” कार्यक्रमात ते बोलत होते.
श्रीधर पाटणकरचे कोट्यवधी रुपयांचे डझनभर फ्लॅट जप्त झाले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील 11 सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत. 6.45 कोटी रुपयांच्या या मालमत्ता आहेत. पुष्पक बुलियन फसवणूक प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने पुष्पक बुलियनमधील पुष्पक ग्रुप कंपनीची 6.45 कोटीची मालमत्ता जप्त केली आहे. निलांबरी प्रकल्पातील या 11 निवासी फ्लॅट जप्त करण्यात आले आहेत. श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे हे फ्लॅट्स आहेत. श्रीधर माधव पाटणकर हे या कंपनीचे मालक आहेत. पीएमएलए कायदा 2002 अंतर्गत 6 मार्च 2017पासून पुष्पक बुलियन आणि ग्रुप कंपनीजवर मनी लॉन्ड्रिंगची केस सुरू आहे. यापूर्वीही ईडीने पुष्पक बुलिनय कंपनीतील महेश पटेल, चंद्रकांत पटेल आणि त्यांच्या कुटुंबातील 21.46 कोटीची संपत्ती जप्त केली आहे.
आदित्य ठाकरें यांनी नंदकिशोर चतुर्वेदी कडून कोट्यवधी रुपयेच मनी लॉंडरींग केलं
आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी स्थापन केलेली कंपनी आज हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मालकीची आहे असा आरोप सोमय्यांनी केला. कोणत्या शेल कंपन्यांमध्ये त्यांनी पैसे घातले आहेत? मनी लाँड्रिंग केले आहे, यात श्रीधर पाटणकर यांचाही समावेश आहे. त्याची माहिती उघड करणार असल्याचे सोमय्या म्हणाले.
19 बंगल्यांच काय?
रश्मी ठाकरे यांनी जानेवारी 2019मध्ये पत्रं लिहिलं लिहून माझ्या नावावर बंगले करा असं सांगितलं होतं. बंगले मी दाखवणार नाही. तुम्ही तिथे बंगले आहेत हे कायदेशीररित्या प्रुव्ह केलं. मी तिथे बघायला गेलो. मला बंगले सापडले नाही. त्याबद्दल मी तक्रार केली आहे. त्यामुळे या बंगल्याबाबत ठाकरे कुटुंबांनी बोलावं असंही किरीट सोमय्या म्हणाले.