Kirit Somaiya: सेव्ह विक्रांतचा निधी राज्यपालांना दिल्याचं सोमय्यांचं पत्रं व्हायरल, किती निधी दिला?; राऊतांचा दावा खरा की खोटा?

Kirit Somaiya: सेव्ह विक्रांतची मोहीम हाती घेऊन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घोटाळा केल्याचा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. या घोटाळ्याला सोमय्या आणि त्यांचे चिरंजीव नील सोमय्याही जबाबदार असून त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल केला आहे.

Kirit Somaiya: सेव्ह विक्रांतचा निधी राज्यपालांना दिल्याचं सोमय्यांचं पत्रं व्हायरल, किती निधी दिला?; राऊतांचा दावा खरा की खोटा?
किरीट सोमय्या यांच्यावर संजय राऊतांचा पुन्हा हल्लाबोलImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 12:40 PM

नवी दिल्ली: सेव्ह विक्रांतची (vikrant) मोहीम हाती घेऊन भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी घोटाळा केल्याचा दावा शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे. या घोटाळ्याला सोमय्या आणि त्यांचे चिरंजीव नील सोमय्याही जबाबदार असून त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल केला आहे. या घोटाळ्यावरून राऊतांनी सोमय्यांवर हल्लाबोल सुरू केलेला असतानाच सोमय्यांनी राज्यपालांना लिहिलेलं एक पत्रं टीव्ही9 मराठीच्या हाती लागलं आहे. या पत्रात सोमय्या यांनी सेव्ह विक्रांतच्या मोहिमेतून 11 हजार 224 रुपयांचा निधी जमा झाल्याची माहिती राज्यपालांना दिली आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी सोमय्यांवर केलेला 58 कोटीच्या घोटाळ्याचा सोमय्यांवर केलेला आरोप खरा की खोटा? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. त्यावर आता राऊत काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

किरीट सोमय्या यांचं हे 2013मधील पत्रं आहे. हे पत्रं टीव्ही9 मराठीच्या हाती लागलं आहे. तत्कालीन राज्यपाल शंकर नारायण यांना त्यांनी हे पत्रं लिहिलं होतं. या पत्रावर सोमय्यांची सहीही आहे. चर्चगेट रेल्वे स्थानकावर 11 हजार 224 रुपयांचा निधी जमा झाल्याची माहिती सोमय्या यांनी या पत्रातून राज्यपालांना दिली आहे. त्यामुळे राऊतांनी या घोटाळ्याचा सांगितलेला 58 कोटीचा आरोप खरा की खोटा यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच राऊत यांनी सोमय्या यांच्या ऑफिसमध्ये 11 बॉक्स भरून आणल्याचा दावाही केला होता. त्याचं काय झालं असाही सवाल केला जात आहे.

पत्रात नेमकं काय लिहिलंय?

किरीट सोमय्या यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात राज्य सरकारवर टीका केली आहे. विक्रांत युद्धनौकेशी जनभावना जोडली गेलेली आहे. गेली अनेक वर्ष विक्रांतचं स्मारक संग्रहालयात करण्याचं राज्य सरकारने मान्य केलं होतं. परंतु केंद्र सरकारने निर्णय मागे घेऊन विक्रांतला बुडवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडे निधी नाही अशी सबब दिली जात आहे म्हणूनच जनभावना कळवण्यासाठी जनतेतून निधी गोळा करण्याचा उपक्रम आज आम्ही चर्चगेट स्टेशन बाहेर राबवला. त्यातून 11 हजार 224 रुपये जमले. हा निधी आपणाकडे सुपूर्द करू इच्छितो. महाराष्ट्राची जनता निधी कमी पडू देणार नाही. विक्रांत वाचवण्यासाठी आपण महाराष्ट्र सरकारला आग्रह करावा ही विनंती, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

राऊतांचे आरोप काय?

याप्रकरणी संजय राऊत यांनी सोमय्यांवर आरोप केले होते. सोमय्या यांनी सेव्ह विक्रांतच्या नावाखाली निधी गोळा केला होता. 11 बॉक्स भरून हा निधी गोळा केला होता. मुलुंडच्या निलम नगरमधील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी हा निधी ठेवला होता. नंतर काही बॉक्स एका बिल्डरच्या कार्यालयात ठेवला. सोमय्यांनी हा निधी मुलाच्या उद्योगात वापरल्याचा दावा राऊत यांनी केला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तसेच काही जणांचे कबुली जवाबही नोंदवले गेले आहेत.

संबंधित बातम्या:

Sanjay Raut: सोमय्यांच्या देशविरोधी कृत्यात सामिल होऊ नका अन्यथा राजभवनाची इभ्रतही जाईल; राऊतांचा राज्यपालांना इशारा

Sanjay Raut: कुठे आहेत दोन ठग?, सोमय्या देशाबाहेर पळून जाऊ शकतात; राऊतांना शंका

Jayant Patil: हिशोबच मांडायचाय तर उद्धव ठाकरे मोदींकडे मांडतील, हिशोबावरून जयंत पाटील आणि दानवेंमध्ये जुंपली

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.