Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सरनाईकांवर कृपादृष्टी, परबांंचं रिसॉर्ट अधिकृत कधी होणार? मग नार्वेकरांवर अन्याय का?’, किरीट सोमय्यांचा घणाघात

"ठाण्यातील विहंग गार्डनचे अनधिकृत बांधकाम करणारे, 114 सदनिका धारकांची फसवणूक करणाऱ्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक चे गुन्हे माफ करण्याचा ठाकरे सरकारने निर्णय घेतला असेल, परंतु महाराष्ट्राला लुटणाऱ्या ठाकरे सरकारला जनता कदापि माफ करणार नाही", अशा शब्दात सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर टीका केलीय.

'सरनाईकांवर कृपादृष्टी, परबांंचं रिसॉर्ट अधिकृत कधी होणार? मग नार्वेकरांवर अन्याय का?', किरीट सोमय्यांचा घणाघात
अजित पवारांच्या वित्त विभागाचा विरोध झुगारुन सरनाईकांना दंड माफ
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 8:37 PM

मुंबई : भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आमदार प्रताप सरनाईकांवरुन (Pratap Sarnaik) पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi) जोरदार निशाणा साधलाय. “ठाण्यातील विहंग गार्डनचे अनधिकृत बांधकाम करणारे, 114 सदनिका धारकांची फसवणूक करणाऱ्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक चे गुन्हे माफ करण्याचा ठाकरे सरकारने निर्णय घेतला असेल, परंतु महाराष्ट्राला लुटणाऱ्या ठाकरे सरकारला जनता कदापि माफ करणार नाही”, अशा शब्दात सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर टीका केलीय.

सोमय्या यांनी एक पत्रक काढून ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. “शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी 2008-2009 मध्ये ठाणे विहंग गार्डन येथील 114 सदनिकाधारकांची फसवणूक केली. 5 मजले अनधिकृत बांधले. 2012 मध्ये प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश आहे. गेल्या आठवड्यात लोकायुक्तांच्या समोर झालेल्या सुनावणीत ठाकरे सरकारने मान्य केले की प्रताप सरनाईक यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यांच्याकडून सगळा दंड आणि व्याज वसूल केले जाणार, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आणि आज ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की प्रताप सरनाईक आमच्या शिवसेनेचा आमदार आहे, म्हणून त्यांची चोरी, गुन्हे माफ. ठाकरे सरकार हे प्रताप सरनाईक यांना माफ करणार. परंतु महाराष्ट्राची जनता या घोटाळेबाज सरकारला कदापी माफ करणार नाही”, अशा शब्दात सोमय्या यांनी शिवसेना आणि ठाकरे सरकारवर टिकास्त्र डागलं.

‘परबांचा रिसॉर्ट अधिकृत कधी करणार? नार्वेकरांवर अन्याय का?’

त्याचबरोबर सोमय्या यांनी अनिल परब यांच्या रिसॉर्टवरुनही उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावलाय. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रताप सरनाईक चे विहंग गार्डन चे अनधिकृत बांधकाम व 21 कोटींचा दंड माफ केला! आत्ता अनिल परब यांचा रिसॉर्ट केव्हा अधिकृत घोषित करणार? मिलिंद नार्वेकर वर अन्याय का? मिलिंद यांचा बंगलो का अधिकृत घोषित केला नाही?”, असे खोचक सवाल सोमय्या यांनी ट्विटरद्वारे केले आहेत.

इतर बातम्या : 

मराठी पाट्या! सर्वच दुकानांचे नामफलक मराठीत लावणे बंधनकारक, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

कोरोनामुक्त होताच रोहित पवार कर्जत नगरपंचात निवडणुकीच्या मैदानात, विजयाची रणनितीही सांगितली!

वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार.