तिकीट कापल्यानंतर सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया, मनोज कोटक डायनॅमिक!
मुंबई: शिवसेनेच्या प्रचंड विरोधानंतर अखेर भाजप खासदार किरीट सोमय्या यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. सोमय्यांऐवजी भाजपने नगरसेवक मनोज कोटक यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारी दिली आहे. मनोज कोटक यांनी उमेदवारी जाहीर होताच खासदार किरीट सोमय्या यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. मनोज कोटक यांनी किरीट सोमय्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. यावेळी किरीट सोमय्या यांनी मनोज कोटक […]
मुंबई: शिवसेनेच्या प्रचंड विरोधानंतर अखेर भाजप खासदार किरीट सोमय्या यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. सोमय्यांऐवजी भाजपने नगरसेवक मनोज कोटक यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारी दिली आहे. मनोज कोटक यांनी उमेदवारी जाहीर होताच खासदार किरीट सोमय्या यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. मनोज कोटक यांनी किरीट सोमय्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले.
यावेळी किरीट सोमय्या यांनी मनोज कोटक हा डायनॅमिक उमेदवार असून, टॉप दहा निकालात त्यांचा निकाल असेल, असा विश्वास व्यक्त केला. आज आनंदाचा दिवस आहे, त्यामुळे कोणावर नाराजी वैगरे नाही, असे किरीट सोमय्या म्हणाले. तर डॉ सोमय्या यांच्या आशीर्वादाने ही सीट निवडून आणू असे कोटक यांनी सांगितले.
किरीट सोमय्यांना राज्यसभेवर पाठवणार?
दरम्यान, भाजपने किरीट सोमय्यांचं तिकीट कापलं असलं, तरी त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. विद्यमान लोकसभा खासदार सोमय्यांचं तिकीट कापल्याने त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांचं राज्यसभेत पुनर्वसन करण्याची शक्यता आहे.
सोमय्यांचं तिकीट कापलं
गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना-भाजपचा ज्या जागेवरुन तिढा कायम होता, त्या ईशान्य मुंबईच्या जागेवरुन अखेर भाजपचा उमेदवार ठरला आहे. भाजपचे नेते आणि मुंबई महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक मनोज कोटक यांना ईशान्य मुंबईतून भाजपने उमेदवारी जाहीर केली. मनोज कोटक यांच्या नावावर भाजपकडून शिक्कामोर्तब झाल्याने, विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना डच्चू मिळाला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेवर आक्रमक टीका करणं किरीट सोमय्यांना भोवलं आहे. शिवसेनेच्या टोकाच्या विरोधामुळे सोमय्यांचा पत्ता कट झाला आहे.
कोण आहेत मनोज कोटक?
• मनोज कोटक हे भाजपचे विद्यमान नगरसेवक आहेत. • मुंबई महापालिका निवडणुकीत ते मुलुंडमधून निवडून आले आहेत • मनोज कोटक हे महापालिकेत भाजपचे गटनेते आहेत • मनोज कोटक यांचा मुलुंड आणि भांडूप परिसरात जनसंपर्क आहे • ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मराठी-अमराठी मतांचा मेळ घालण्यासाठी मनोज कोटक यांचं नाव पुढे
ईशान्य मुंबईतील लढत
दरम्यान, मनोज कोटक यांना उमेदवारी मिळाल्याने आता ईशान्य मुंबईतून मनोज कोटक विरुद्ध राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांच्यात लढत होणार आहे.
संबंधित बातम्या
ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्यांना डच्चू, भाजपकडून मनोज कोटक यांना उमेदवारी!