“कोल्हापूरातील बँकेबाबत किरीट सोमय्या यांनी हा दिला इशारा”; हसन मुश्रीफ आव्हान स्वीकारणार का..?
या घोटाळ्यामुळेच किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करताना त्यानी शेतकऱ्यांना लुटण्यासाठी त्यांनी बँकेलाही सोडल नाही असा आरोपही त्यांनी त्यांच्यावर ठेवला आहे.
कोल्हापूरः कोल्हापूर जिल्हा बँकेवरून किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर आताही गंभीर आरोप केले आहेत. त्याचबरोबर हसन मुश्रीफ यांनी जे बोगस कर्ज घेतले आहे. त्याची माहिती त्यांनी सात दिवसाच्या आत जाहीर करावी अन्यथा ते सगळं प्रकरण आम्ही जाहीर करीन असं आव्हान किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ याना दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी 500 कोटींपेक्षा जास्त घोटाळा केल्या असल्याचा आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांना लुटण्यासाठी मुश्रीफ यांनी बँकेलाही सोडले नाही असा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
कोल्हापूर जिल्हा बँकेतून हसन मुश्रीफ यांनी आपण बोगस कर्ज किती होते त्याची माहिती त्यांनी सात दिवसात जाहीर करावी नाही तर तो आकडा आम्हीच जाहीर करु असं थेट आव्हान मुश्रीफ यांना करण्यात आले आहे.
किरीट सोमय्या यांनी आज कोल्हापूर दौरा करत त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.
भाजपचे माजी खासदार असलेल्या किरीट सोमय्या यांचे आज कोल्हापूरात जोरदार जंगी स्वागत करण्यात आले होते. कोल्हापूरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी थेट आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी बोगस कर्जाचे आकडे जाहीर करावे असं त्यांच्याकडून आव्हानही करण्यात आले.
किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर ज्याप्रमाणे कोल्हापूर जिल्हा बँक लुटल्याचा आरोप केला आहे. त्याच प्रकारे त्यांनी संताजी घोरपडे साखर कारखानही लुटल्याचा आरोप त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
बँकेत आणि साखर कारखान्यात मोठे घोटाळे केल्या असल्यामुळेच हसन मुश्रीफ यांची सर्व बाजूंनी चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांचा या सगळ्या प्रकरणात 158 कोटींचा घोटाळा दिसत होता मात्र तोच आकडा आता 500 कोटींच्याही बाहेर असल्याचा आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
या घोटाळ्यामुळेच किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करताना त्यानी शेतकऱ्यांना लुटण्यासाठी त्यांनी बँकेलाही सोडल नाही असा आरोपही त्यांनी त्यांच्यावर ठेवला आहे.
हसन मुश्रीफ यांनी जर आव्हान स्वीकारले असेल तर त्यांनी कोल्हापूर जिल्हा बँकेतून किती बोगस कर्ज घेतले, त्याच बरोबर टॉप कर्जदारांची नावंही त्यांनी जाहीर करावी असंही त्यांनी म्हटले आहे.