स्वत:लाच मुख्यमंत्री समजतो असं म्हणणाऱ्या आमदाराला हवंय मंत्रीपद; ‘भावी मंत्री आप्पासाहेब’, मतदारसंघात बॅनरचा धुरळा

येत्या 2 नोव्हेंबर रोजी आमदार किशोर पाटील यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्या मतदार संघात ठिकठिकाणी गावांमध्ये भावी मंत्री आमदार किशोर पाटील अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत.

स्वत:लाच मुख्यमंत्री समजतो असं म्हणणाऱ्या आमदाराला हवंय मंत्रीपद; 'भावी मंत्री आप्पासाहेब', मतदारसंघात बॅनरचा धुरळा
स्वत:लाच मुख्यमंत्री समजतो असं म्हणणाऱ्या आमदाराला हवंय मंत्रीपदImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 01, 2022 | 1:38 PM

जळगाव: शिंदे गटाचे औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट (sanjay shirsat) यांनी मंत्रिपद मिळण्याची इच्छा अनेकदा बोलून दाखवली आहे. शिरसाट यांच्यापाठोपाठ जळगावमधील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील (kishor patil) यांनीही मंत्रीपद (minister) मिळण्याची इच्छा यापूर्वी बोलून दाखवली होती. आताही किशोर पाटील यांनी ही इच्छा बोलून दाखवली आहे. इतकेच नाही तर त्यांच्या संपूर्ण मतदारसंघात ‘भावी मंत्री आप्पासाहेब’ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असा मजकूर लिहिलेले बॅनर्सही लागले आहेत. त्यामुळे किशोर पाटील यांना मंत्रिपद मिळणार की पुन्हा वेट अँड वॉचवर राहणार याकडे लक्ष लागलं आहे.

आमदार किशोर पाटील यांचा उद्या वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आज त्यांच्या मतदारसंघात म्हणजेच पाचोरा येथे आज भव्य रोजगार मेळावा पार पडला. या मेळाव्याला आमदार किशोर पाटील उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मला मंत्री पण नको आहे, मी स्वतःलाच मुख्यमंत्री समजतो असे म्हणणारे आमदार किशोर पाटील यांनी आता स्वतः मंत्री पदाची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा

किशोर पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही अपेक्षा व्यक्त केली आहे. जनतेच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. ते आशीर्वाद आता किती पावतात हे मला माहीत नाही. मात्र स्वतः अपेक्षा व्यक्त करतोय, जर संधी मिळाली तर निश्चित संधीच सोने करेन, असं किशोर पाटील म्हणाले. किशोर पाटील हे पाचोऱ्याचे आमदार आहेत.

येत्या 2 नोव्हेंबर रोजी आमदार किशोर पाटील यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्या मतदार संघात ठिकठिकाणी गावांमध्ये भावी मंत्री आमदार किशोर पाटील अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. ‘भावी मंत्री आप्पासाहेब’ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असंही या बॅनर्सवर लिहिलेलं आहे. त्यामुळे आता दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी किशोर पाटील यांना मंत्रिपद मिळतं की काय अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

शिंदे गटाचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार सोहळा पार पडला. यावेळी मंत्री पद न मिळाल्याने किशोर पाटील व त्यांचे कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा होती. यावर बोलताना किशोर पाटील यांनी मात्र मी नाराज नसल्याचं सांगत आपण स्वत:ला मुख्यमंत्री समजतो, अशी प्रतिक्रिया दिली होती.

'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्...
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्....
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला...
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला....