देव देवेंद्र सुबुद्धी देवो आणि अमृताला प्रसिद्धी देवो, भाजपला किशोर तिवारींचं ब्लॉगने उत्तर
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना मर्यादेचा सल्ला देणारे शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी पुन्हा एकदा (Kishor tiwari blog) भाजपवर टीका केली आहे.
नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना मर्यादेचा सल्ला देणारे शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी पुन्हा एकदा (Kishor tiwari blog) भाजपवर टीका केली आहे. किशोरी तिवारी यांनी भाजपवर ब्लॉग लिहून हल्लाबोल चढवला आहे. “देव देवेंद्र सुबुद्धी देवो आणि अमृताला प्रसिद्धी देवो,” अशी खोचक टीकाही या ब्लॉगमधून करण्यात आली आहे. त्यामुळे अमृता फडणवीसांवरुन पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेतील द्वंद्व सुरु झाल्याचं चित्र दिसत आहे.
किशोर तिवारी यांनी याआधी भाजपला पत्र लिहून सल्ला दिला होता. त्यानंतर आता त्यांनी ब्लॉग लिहित भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. शिवसेना नेते किशोरी तिवारींनी अमृता फडणवीसांना चांगलंच प्रत्युत्तर केल्याने सेना-भाजपमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीसांनी शिवसेनेवर टीका केली होती. यावरुन किशोर तिवारी यांनी संघाचे नेते भैय्याजी जोशींना पत्र लिहित टीका केली होती. त्यानंतर आता किशोर तिवारींनी भाजप आणि अमृता फडणवीसांवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी भलामोठा ब्लॉग लिहून अमृता फडणवीसांना सल्ला दिल्याचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. यात त्यांनी अमृता फडणवीसांवर टीका करतानाच भाजप, संघ, देवेंद्र फडणवीसांववर जोरदार प्रहार (Kishor tiwari blog) केला आहे.
“संघाने योग्यवेळी पुढाकार न घेतल्यामुळे शिवसेनासारखा हिंदू मनाचे आणि जनहीत जोपासणारा पक्ष दूर लोटला गेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या टीकेला सेनेच्या स्टाईलने उत्तर द्यायचे नाही असे सांगितलं. त्यामुळे कोणीही आंदोलन केले नाही.”
“मात्र दुसऱ्या दिवशी सूनबाई अमृता यांनी रश्मीताईंना लपेटून आदित्य ठाकरेंना किड्याची उपमा देत आपले पती प्रेम प्रगत केले. ते अनेक भाजप नेत्यांना आवडले नाही. मी अमृता यांना दिलेला सल्ला न वाचतात, काही भाजप आमदारांनी आगपाखड केली. त्यामुळं मला अतिव वेदना झाल्या,” असे किशोर तिवारी यांनी ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.
“पोटभरू मंडळी फेसबुक आणि व्हाट्सअॅपवर मला एकेरी भाषेत शिव्या देतात. माझ्या पत्नी आणि मुलींना टॅग करतात. अमृतांनी महिला स्वातंत्र्य जरा जास्तच वापरले. त्यामुळे देवेंद्रजींच्या अडचणी वाढत आहेत. मला पोटभरु भ्रष्ट धुंकीचाटू नेत्यांकडून शिव्या देण्याचा प्रकार आवरा, अशी बुद्धी देवाने द्यावी यासाठी हा प्रपंच केला,” असेही किशोर तिवारींनी ब्लॉगमध्ये म्हटलं (Kishor tiwari blog) आहे.
“साऱ्या महिला अधिकाराचे काम करणाऱ्या अतिविदुषी बहिणींची, अमृता बेटाची विनाशर्त माफी मागतो. त्यांनी कोणालाही काहीही ट्विट करून अपमान करावा, राजकारणात वाटेल त्या दिशेने नाक खुपसावे. आम्ही चुकूनही बोलणार नाही,” असेही त्यांनी या ब्लॉगमध्ये स्पष्ट केलं आहे.
दरम्यान या ब्लॉगमधून किशोर तिवारींनी अमृता फडणवीस, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपसह संघावरही ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
अमृता फडणवीस सातत्यानं शिवसेनेवर निशाणा साधत आहेत. त्यावर शिवसेना नेते बोलत नसले, तरी किशोर तिवारींनी मात्र आधी पत्र आणि आता ब्लॉगमधून टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळं आता याला अमृता फडणवीस किंवा देवेंद्र फडणवीस काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणं महत्वाचं ठरणार (Kishor tiwari blog) आहे.