खोके मिळाल्याचा पुरावा आमच्याकडे आहे!! किशोरी पेडणेकरांनी बोलताना उघडही केला.. पाहा Video
लोकशाहीचा स्तंभ म्हणून तुम्ही कोर्टात गेलात आणि प्रत्येकावरती केसेस करायला लागलात तर हे पुरावे आहेत, हे विसरू नका… असा इशारा किशोरी पेडणेकर यांनी दिलाय.
मुंबईः शिंदे गटाच्या आमदारांनी (Shivsena MLA) खोके घेतलेत आणि त्याचा आमच्याकडे पुरावा आहे, असं वक्तव्य किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केलंय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबत गुवाहटीला गेलेल्या आमदारांनी खोके घेतल्याचा आरोप वारंवार केला जातोय. पण हे आरोप कोर्टात सिद्ध करा, असे आवाहन आता शिंदे गटातर्फे देण्यात येत आहे. त्यालाच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलंय.
त्या म्हणाल्या, विधानसभेत जेव्हा मोठ्या प्रमाणात बोंबाबोंब झाली. आरोपांच्या फैरी झडू लागल्या. त्यावेळेला शंभूराज देसाईंनी सांगितलं हो मिळाले… तुम्हाला हवेत का.. असं विचारल्यानंतर पुष्टी मिळते… पुष्टी मिळाल्यामुळे लोकं म्हणत असतील..
मा. शिवतारे यांना मी सांगते, लोकशाहीचा स्तंभ म्हणून तुम्ही कोर्टात गेलात आणि प्रत्येकावरती केसेस करायला लागलात तर हे पुरावे आहेत, हे विसरू नका… असा इशारा किशोरी पेडणेकर यांनी दिलाय.
आमदार-खासदार मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेत आहेत, असा गौप्यस्फोट करण्यात आलाय. त्यावर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, आमदार-खासदार भेटत असतील. उद्धव ठाकरे यांनी तर 19 जूनलाच सांगितलंय… ज्यांना जायचंय त्यांनी जा.. आईचं दूध विकू नका.. याचा अर्थ आताही कुणी जाणार असतील कुणी थांबवणार नाही..
पाहा पुराव्यांबद्दल काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?
येणार-येणार असं हवा प्रदूषण करू नका. येणार असतील तर घ्या… ते कसे घेतले जातात, ते सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे शिंदे साहेब यांना त्रास देण्याचं काम त्यांच्या गटाचे वाचाळवीर करतायत… असं वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केलंय.
सुप्रिया सुळेंबद्दल एवढं घाणेरडं वक्तव्य होतं, तेव्हा त्यांना तुम्ही पाठिशी घालता का? उत्कृष्ट संसदपटू म्हणून सुप्रिया सुळेंचं कौतुक होतं. त्यांना असं तुम्ही म्हणता हे लांच्छनास्पद असल्याची टीका किशोरी पेडणेकर यांनी केली.
त्या म्हणाल्या, ‘ महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर बिघडतोय. सामनातून आम्ही फडणवीस साहेबांना आवाहन केलं होतं. त्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यांनीही नेत्यांना नीट भाषा वापरण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे सगळ्यांनी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.